सामाजिक कार्ये

इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व्हावे,आरोग्यमंत्री Rajesh Tope राजेश टोपे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.

इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय मल्टिस्पेशालिटी रुग्णालय व्हावे, रुग्णालयाकडील 42 कर्मचार्‍यांना शासनाने आरोग्य विभागाने समावेशन करावे, रुग्णालयाची क्षमता 300 बेडची करण्यात यावी आणि रुग्णालय व निवासस्थान दुरुस्तीसाठी मंजूर निधी तातडीने उपलब्ध करुन देण्यात यावा, या संदर्भात आरोग्यमंत्री Rajesh Tope राजेश टोपे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. लवकरात लवकर हे प्रश्‍नी मार्गी लावण्यात येतील अशी ग्वाही आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली. या बैठकीत आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक, जीएडी सामान्य विभागाच्या उपसचिव गीता कुलकर्णी, आरोग्य विभागाचे सहसचिव मनोहर ठोंबरे, नगरविकास विभागाचे सहसचिव स. ज. मोघे, विधी व न्याय विभागाच्या सहसचिव अश्‍विनी सैनी, आरोग्य सेवा संचालक डॉ. साधना तायडे, सहसंचालक डॉ. नितीन आंबोडकर, कोल्हापूर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पीपाटील, आयजीएमचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. आर. आर. शेटे आदी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos