सामाजिक कार्ये

इचलकरंजीमध्ये महाराष्ट्रातील प्रथमच वस्त्रशाळा प्रयोग कार्यशाळा संपन्न

🏠💐🏭 "वस्त्रशाळा" उद्घाटन💐🏭🏠 फक्त वही,पेन म्हणजे शिक्षण नव्हे तर बुद्धिला सत्याकडे,भावनेला माणुसकीकडे,आणि शरिराला श्रमाकडे नेण्याचा रस्ता म्हणजेच "शिक्षण"...! असे शिक्षण हवे जे "राष्ट्राला सशक्त आणि बलशाली बनवेल" जसे जेवल्यावर होणारे समाधान हे तात्पुरते असते,याउलट शिक्षणातुन भेटनारी ज्ञानाची शिदोरी आयुष्यभर पुरते.पोटाची भुक भागवावीच,पण एक पाऊल पुढे टाकुन शिक्षण घेऊन,माणसाने बुद्धिचीही भुक भागवावी....! "जसा माणुस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो,तसा तो शिक्षणा अभावी जिवंतपणी दुसऱ्यामुळे गुलाम होतो" असे डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या चरित्रामध्ये लिहले आहे आयुष्य फौंडेशन आणि वंदे फौंडेशन संचलीत इचलकरंजीमध्ये प्रथमच यंत्रमाग कामगारांच्या आणि गरीबीशी संघर्ष करणाऱ्या मुला-मुलींसाठी फक्त रविवारी भरणारी विना दप्तराची शाळा म्हणजेच "वस्त्रशाळा"....! 31 डिसेंबर 2017 रोजी डॉ.राधाकृष्णन विद्या मंदिर क्र.2 ,इचलकरंजीमध्ये महाराष्ट्रातील प्रथमच प्रयोगास सुरूवात केली.

Activity Photos

Activity Videos