सामाजिक कार्ये

यंत्रमाग व्यवसायासाठी वस्त्रोद्योग मंत्री मा.ना. अस्लम शेखसो यांची भेट...

12 फेब्रुवारी २०२० रोजी मुंबई येथील मंत्रालय येथे वस्त्रोद्योग मंत्री मा.ना. अस्लम शेखसो Aslam Shaikh यांची यंत्रमाग व्यवसायासाठी व्याज, अनुदान, १० टक्के भांडवली अनुदान व वीज अनुदान या योजनेची तरतूद मार्च २०२० च्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात यावी यासाठी भेट घेतली. महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग व्यवसाय मागील काही वर्षापासून अडचणीत आहे. या व्यवसायाला उर्जितावस्था आणण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारकडून पाऊले उचलली जात आहेत.आपल्या शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागामार्फत चालू असलेल्या व्याज अनुदान योजना, १० टक्के भांडवली अनुदान योजना, वीज अनुदान व अन्य योजनेच्या संदर्भात मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या आहेत. त्याद्वारे महाराष्ट्र राज्याचे #वस्त्रोद्योगधोरण २०११-२०१७ व २०१८-२०२३ या अंतर्गत लाभ घेत असलेल्या वस्त्रोद्योग प्रकल्पासाठी आर्थिक तरतूद करणे आवश्यक असल्याने यंत्रमाग व्यवसायासाठी व्याज अनुदान, १० टक्के भांडवली अनुदान व वीज अनुदान योजनांचा मार्च २०२० मधील #अर्थसंकल्पात समाविष्ट करून भरीव तरतूद करावी अशी मागणी वस्त्रोद्योग मंत्री मा.ना.अस्लम शेख यांच्याकडे केली.

Activity Photos

Activity Videos