सामाजिक कार्ये

राज्यातील विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमाग आणि अनुषंगिक उद्योगातील कामगारांसाठी माथाडी मंडळाच्या धर्तीवर कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासंदर्भात कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत झालेल्या मुंबई येथील बैठक

राज्यातील विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमाग आणि अनुषंगिक उद्योगातील कामगारांसाठी माथाडी मंडळाच्या धर्तीवर कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासंदर्भात कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्यासोबत झालेल्या मुंबई येथील बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. कामगार मंत्री वळसे-पाटील यांनी या संदर्भात शासनाकडून कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्यासबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, असे सांगितले. त्यामुळे कामगार कल्याणकारी मंडळाचा प्रश्‍न मार्गी लागण्याचा मार्ग सुकर होणार आहे. विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमाग उद्योगातील कामगारांसाठी स्वतंत्र कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करावे या संदर्भात बैठक घेऊन चर्चेतून निर्णय घ्यावा यासाठी पत्राद्वारे मागणी केली होती. मंत्री वळसे-पाटील यांनी या संदर्भात बैठक घेण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार मंगळवारी दुपारी मंत्रालयात बैठक पार पडली. या बैठकीत माझ्या समवेत कामगार विभागाचे प्रधान सचिव, राज्याचे कामगार आयुक्त, विकास आयुक्त (असंघटीत कामगार), उपसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. कामगारांच्या समस्यांबाबत सविस्तर माहिती देतानाच देशातील एकूण विकेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमागापैकी सुमारे 60 टक्के यंत्रमाग एकट्या महाराष्ट्रात आहेत. त्यातील कामगारांची संख्या लक्षणीय असून देशातील एकूण कापड उत्पादनापैकी 62 टक्के उत्पादन विक्रेंदीत क्षेत्रातील यंत्रमाग उद्योगातून होते. या कामगारांसाठी माथाडी मंडळाच्या धर्तीवर प्रत्येक जिल्ह्यात मंडळ नेमून कामगार कल्याणकारी योजना राबविण्यात याव्यात. या संदर्भाता यापूर्वी राज्य सरकारमध्ये काही निर्णयसुध्दा झाले आहेत. त्यावर अभ्यासगट नेमून त्या संदर्भातील निर्णय प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली होती. मात्र अद्याप काहीही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. विकेंद्रीत क्षेत्रातील कामगारांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसल्याने त्यांना कामगार कल्याणकारी मंडळ नेमून त्याद्वारे योजना राबविण्याबाबत निर्णय होणे का गरजेचे आहे हे अनेक उदाहरणांद्वारे पटवून दिले. राज्यातील सर्वच विकेेंद्रीत क्षेत्रातील यंत्रमाग व अनुषंगिक उद्योगातील कामगारांसाठी जिल्हानिहाय कामगार कल्याणकारी मंडळ स्थापन करुन त्यांना आधार द्यावा, अशी मागणी केली. चर्चेअंती कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी, या संदर्भात शासनाकडून लवकरात लवकर निर्णय करुन त्याची अंमलबजावणी करुन कामगारांना लाभ मिळवून देऊ, अशी ग्वाही दिली आहे. - आमदार प्रकाशआण्णा आवाडे

Activity Photos

Activity Videos