सामाजिक कार्ये

27 एचपीवरील यंत्रमागासाठी जाहीर केलेल्या 75 पैशांची सवलत आणि 27 एचपीखालील यंत्रमागासाठी वीज दरात 1 रुपयाची अतिरिक्त सवलत आणि कर्जावरील व्याजात 5 टक्क्यांची सवलत हे प्रश्‍न कॅबिनेटसमोर ठेवून त्यांना मंजूरी देण्यासह अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिली. त्यामुळे वस्त्राद्योगांच्या प्रश्‍नांसाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. वस्त्रोद्योग आणि सूत गिरण्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक बोलविली होती.

27 एचपीवरील यंत्रमागासाठी जाहीर केलेल्या 75 पैशांची सवलत आणि 27 एचपीखालील यंत्रमागासाठी वीज दरात 1 रुपयाची अतिरिक्त सवलत आणि कर्जावरील व्याजात 5 टक्क्यांची सवलत हे प्रश्‍न कॅबिनेटसमोर ठेवून त्यांना मंजूरी देण्यासह अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत दिली. त्यामुळे वस्त्राद्योगांच्या प्रश्‍नांसाठी केलेल्या प्रयत्नाला यश आले आहे. वस्त्रोद्योग आणि सूत गिरण्यांच्या समस्यांचा आढावा घेऊन त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक बोलविली होती. गत काही वर्षांपासून वस्त्रोद्योग विशेषत: यंत्रमाग व्यवसाय व सहकारी सूत गिरण्या आर्थिक संकटातून मार्गक्रमण करीत आहेत. या व्यवसायाला उभारी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. या बैठकीत महत्वपूर्ण मुद्दे मांडताना वस्त्रोद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. त्याला शासनाकडून पाठबळ देण्याची गरज असल्याचे आहे. शासनाने विविध प्रकारच्या सवलतींचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी होत नाही. डिसेंबर 2019 पासून 27 एचपीवरील यंत्रमागाच्या वीज दरात 1.22 रुपयांची कपात केली असून एप्रिल 2020 पासून त्यापैकी 40 पैशांची सवलत दिली जात आहे. तर उर्वरीत 75 पैशांची मार्च 2020 च्या अर्थसंकल्पात घोषणा करण्यात आली होती. पण आजपर्यंत त्याची अंमलबजावणी झालेली नसून ती तातडीने करण्यात यावी. 27 एचपी खालील यंत्रमागासाठी प्रतियुनिट 1 रुपये सवलतीची घोषणा करण्यात आली असून त्याची अंमलबजावणी करण्यात यावी. उद्योजकांच्या कर्जावरील व्याजदरात 5 टक्के व्याज दराची अधिसूचना काढण्यात आलेली आहे. परंतु त्यामध्ये असलेल्या त्रुटी व जाचक अटी यामुळे त्याची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक अर्ज प्रलंबित असून या त्रुटी व जाचक अटी दूर करुन यंत्रमगाधकारांना 5 टक्के व्याज अनुदान त्वरीत देण्यात यावे. त्याचबरोबर बँका व वित्तीय संस्थांच्या सर्व प्रकारच्या जुन्य व नव्या कर्जासाठी ही योजना असावी. शिवाय यंत्रमाग व्यवसायासाठी मल्टिपार्टी जोडणी संदर्भात मंजूरी देण्याचे सांगूनही अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे त्याचीही अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी केली. यावर झालेल्या चर्चेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी, 27 एचपीवरील यंत्रमागासाठी 75 पैशांच्या सवलतीची अंमलबजावणी आणि 27 एचपीखालील यंत्रमागासाठी वीज दरात 1 रुपयाची अतिरिक्त सवलत हे दोन्ही विषय कॅबिनटेसमोर ठेवून मंजूरी देऊन त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करु अशी ग्वाही दिली. यावेळी इचलकरंजी पॉवरलूम असोशिएशनचे अध्यक्ष सतिश कोष्टी, संचालक रफिक खानापुरे, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos