सामाजिक कार्ये

सातत्याच्या पाठपुराव्यामुळे इचलकरंजी वाढीव हद्द शहापूर गट क्र. 38 या जागेवर क्रीडागण विकसित करण्यासाठी केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजना अंतर्गत मिळालेल्या अनुदानातून मंजूर झालेल्या क्रीडागणाची पाहणी करण्यासाठी आलेले स्पोर्टस अधिकारी मा.श्री. संजय मोरे साहेब यांचे स्वागत करून शहापूर येथील मैदानाची पाहणी सर्व अधिकाऱ्यांसमवेत केली.

वस्त्रनगरीबरोबरच क्रीडापंढरी अशी ओळख असलेल्या इचलकरंजी येथील शहापूरात केंद्र शासनाच्या खेलो इंडिया अंतर्गत उभारण्यात येणार्‍या क्रीडा संकुलाचे काम लवकरच सुरु होणार आहे. या पार्श्‍वभूमीवर मंगळवारी स्पोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई)चे राज्यातील अधिकारी संजय मोरे यांनी प्रस्तावित क्रीडा संकुलाच्या जागेची पाहणी करुन माहिती घेतली. त्यामुळे आता या क्रीडा संकुलाच्या प्रत्यक्ष उभारणीला गती मिळणार असून हे काम तातडीने व्हावे यासाठी आमदार प्रकाश आवाडे व जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांचा पाठपुरावा सुरु आहे. केंद्र शासनाच्या ‘खेलो इंडिया’ अंतर्गत शहापूर येथे गट क्र. 38 येथे भव्य क्रीडा संकुल उभारण्यात येणार आहे. या क्रीडा संकुलासाठीचा सुमारे 12 कोटी 43 लाख 17 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव इचलकरंजी नगरपरिषदेने शासनाकडे पाठविला आहे. या कामी आमदार प्रकाश आवाडे आणि जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा सुरु आहेत. राज्य शासनाने या प्रस्तावाला यापूर्वीच मान्यता दिलेली असून अंतिम मान्यतेसाठी हा प्रस्ताव केंद्र शासनाच्या क्रीडा मंत्रालयाकडे प्रलंबित आहे. त्याला तातडीने मान्यता मिळण्यासह निधी उपलब्ध होऊन क्रीडा संकुलाचे काम प्रत्यक्षात सुरु व्हावे म्हणून आमदार आवाडे प्रयत्नशील आहेत. आमदार आवाडे यांनी, शहापूरचा इचलकरंजी हद्दीत समावेश झाल्यानंतरच्या विकास आराखड्यात शहापूरातील 1 लाख 88 हजार स्क्वेअर फुट म्हणजेच सव्वाचार एकर जागा क्रीडा संकुलासाठी आरक्षित करण्यात आली. मागील दहा वर्षापासून त्याचा पाठपुरावा सुरु असून आता त्याला प्रत्यक्षात गती मिळत आहे. खेलो इंडिया अंतर्गत याठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध होणार असून शहर व परिसरातील सर्वच खेळाडूंना ती पर्वणी ठरणार आहे. अधिकार्‍यांनी या जागेची पाहणी केली असून ते सविस्तर अहवाल देतील. त्यानंतर पुढील पूर्ततेसाठी आपण प्रयत्न करुन हे क्रीडा संकुलात लवकरात लवकर उभारले जाईल, असे सांगितले. या प्रस्ताविक क्रीडा संकुलाच्या जागेची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाच्या स्पोर्टस् अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडिया (साई) चे रिजनल सेंटरचे अधिकारी संजय मोरे आले होते. त्यांनी नियोजित जागेची संपूर्ण पाहणी करुन माहिती जाणून घेतली. या क्रीडा संकुलात 200 मीटर रनिंग ट्रॅक, अ‍ॅथलॅटिक स्टेडियम, कबड्डी, व्हॉलीबॉल, खो-खो मैदान, जलतरण तलाव, बॅडमिंटन हॉल, शूटिंग रेंज, रोल बॉल, लॉन टेनिस आदी सुविधा असणार आहेत. यावेळी श्रीरंग खवरे, रणजित जाधव, दादा भाटले, सचिन हेरवाडे, रावसाहेब पाटील, पांडुरंग सोलगे, अशोक पुजारी, नगरपरिषदेचे अभियंता संजय बागडे, अनिल सुतार, सचिन कांबळे, जितेंद्र साळुंखे, विजय पाटील आदी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos