सामाजिक कार्ये

पूरपरिस्थितीच्या नियोजनाबद्दल आढावा..

पूर नियोजन २०२० नियंत्रणच्या अनुषंगाने उपाययोजना व नियोजनासाठी वेबेक्स व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे जिल्ह्यातील सर्व खासदार,आमदार आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या सोबत २२ मे २०२० रोजी पूरपरिस्थितीच्या नियोजनाबद्दल आढावा घेतला. यावेळी आढावा बैठकीमध्ये संभाव्य पूरपरिस्थितीशी सामना करण्यासाठी खालील विषयांवर जिल्हा प्रशासना सोबत चर्चा केली. १.संभाव्य महापूराच्या पार्श्‍वभूमीवर नगरपरिषदेच्यावतीने पूरग्रस्त भागातील नागरिकांना महापूराची परिस्थिती निर्माण झाल्यास घरे मोकळी करुन अन्यत्र निवारा शोधावा अशा आशयाची पत्रे दिल्यामुळे, महापूराला रस्ते बांधणी, धरणे, बांध यासह मानवनिर्मित कारणे कारणीभूत असून त्यामुळे पाणी पसरुन पूराची स्थिती निर्माण होते. त्यामुळे आपणही कोठेतरी कमी पडतोय. त्यासाठी जनतेलाच व्यवस्था करण्यास सांगणे हे चुकीचे असल्याचे सांगितले. २.पुढील 15 दिवसात पावसाळ्याला सुरुवात होत आहे. तर जिल्ह्यातील राधानगरी, काळम्मावाडी, वारणा (चांदोली) तसेच कोयना धरणांमध्ये मागील वर्षापेक्षा यंदा पाणीसाठा अधिक आहे. हे पाणी सोडण्यासंदर्भात आधीच नियोजन होणे गरजेचे होते.मागील वर्षीसुध्दा योग्य नियोजन न झाल्यामुळेच महापूराचे संकट ओढावले गेले. ती परिस्थिती लक्षात घेऊन यंदा योग्य ते नियोजन व्हावे, अशी मागणी केली. 3.हिडकल आणि अलमट्टी या धरणातील पाणीसाठ्यामुळे बॅकवॉटरचा फटका प्रथमत: शिरोळ आणि पाठोपाठ हातकणंगले तालुक्यात म्हणजेच इचलकरंजी शहराला बसतो. त्याठिकाणाहूनही पाण्याचे योग्यप्रकारे नियोजनासाठी प्रयत्न व्हावेत असे सांगितले. ४.मागील वर्षी उद्भवलेल्या महापूरामुळे शेतीचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. पण अद्यापही इचलकरंजीतील शेती नुकसानीचे पैसे मिळाले नसल्यामुळे या संदर्भात पाठपुरावा केला. पण पैसे मंजूर असूनही ते का दिले जात नाहीत? असा प्रश्‍नही मांडला.

Activity Photos

Activity Videos