सामाजिक कार्ये

माणगाव येथे संपन्न होणाऱ्या लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आढावा बैठक ...

22 फेब्रुवारी २०२० भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांचे माणगाव येथे स्मारक उभारण्यात आले आहे. त्याचा लोकार्पण सोहळा व माणगाव येथे २१ मार्च १९२० साली डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राजर्षी शाहू महाराज यांच्या माणगाव परिषदेला २१ मार्च २०२० रोजी १०० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त माणगाव येथे संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी आढावा बैठक पार पडली. यावेळी या कार्यक्रमासाठी सर्व नागरिकांच्या सूचना जाणून घेऊन प्रत्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासी स्थानाची आणि कार्यक्रम स्थळाची पाहणी केली. आणि त्या ठिकाणची डागडुजी करण्याची सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांना केली. या आढावा बैठकीस माझ्या समवेत ग्रामविकासमंत्री ना.हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हा परिषद सदस्य राहुल प्रकाश आवाडे ,खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजूबाबा आवळे, माजी आमदार सुजित मिणचेकर, जयसिंगराव पोवार, जिल्हाधिकारी दौलत देसाई, प्रांताधिकारी विकास खरात, जिल्हा परिषद सदस्य सौ.वंदना मगदूम, हात.पंचायत समिती सभापती महेश पाटील, माणगाव सरपंच सौ.ज्योती कांबळे, समाजकल्याण सभापती सौ.स्वाती सासणे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos