सामाजिक कार्ये

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे.

मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे. महाराष्ट्रातील सर्व मराठा समाजाचा अत्यंत महत्वाचा असलेला मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाली. मराठा समाजाने मोठ्या आंदोलनाने मिळवलेल्या आरक्षणाला स्थगिती मिळण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. आज इचलकरंजीमध्ये मराठा समाजाच्या आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये मी सहभागी झालो होतो. आरक्षणाच्या विषयावर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये जनजागृती करून मराठा समाजाने अतिशय शांततेच्या मार्गाने "एक मराठा लाख मराठा" अशी घोषणा केली होती. सर्व समाज रस्त्यावर आला होता. आणि इतक्या मोठ्या प्रमाणात रस्त्यावर येऊनसुद्धा सुप्रीम कोर्टाद्वारे या निर्णयाला स्थगिती देण्यात आली. या निर्णयाबाबत काही सामाजिक जबाबदाऱ्या व शांततेच्या मार्गाने सामाजिक बांधिलकी जोपासून निराकरण करायचे आहे. पूर्वी देखील आरक्षण प्रश्नी मराठा समाजासोबत होतो आणि यापुढे सुद्धा मराठा समाजासोबत राहील. आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही. तसेच या कोरोनाच्या महामारीमध्ये मराठा समाजाला दुर्लक्षित किंवा स्थगिती न देता सरकारने मराठा समाजाच्या शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षणासंबंधी योग्य तो निर्णय घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे, अशी मागणीही केली. मराठा आरक्षणाबाबत निर्णय होईपर्यंत अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून तरुणांना स्वतःच्या पायावर उभारण्याची योजना आहे त्याच्यामध्ये स्वतः पुढाकार घेऊन तरुणांना उज्वल भविष्यासाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यात येईल, आणि राज्यात चालू असलेली रिक्त पोलीस भरती थांबवण्याच्या निर्णयात मोर्चाच्या माध्यमातून सहभागी असेन. व आरक्षण प्रश्नी मराठा समाज जो काही निर्णय घेईल तीच माझी भूमिका असेल. - आमदार प्रकाशआण्णा आवाडे

Activity Photos

Activity Videos