सामाजिक कार्ये

ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदेत करण्याबाबत मा.ना.श्री. हसन मुश्रीफ यांची भेट ...

६ फेब्रुवारी २०२० रोजी कबनूर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगर परिषदेत करण्याबाबत ग्रामविकास मंत्री मा.ना.श्री. हसन मुश्रीफ यांची भेट घेतली. कबनूर गावची लोकसंख्या सतत वाढत चालली असून सध्या कबनूर गावची लोकसंख्या ५५००० पेक्षा अधिक आहे. उपलब्ध होणाऱ्या निधीतून गावासाठी आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरत आहे, म्हणून ग्रामपंचायत सभा, ग्रामसभा यामध्ये ठराव करून शासनाकडे नगरपरिषद होणेबाबत मागणी केली. कबनूर ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीबाबत आरक्षण जाहीर झाले आहे ते थांबवून नगर परिषदेची स्थापना करून त्यानंतर नगर परिषदेच्या निवडणुका घेण्यात याव्यात , याबाबत निवेदन देण्यात आले.

Activity Photos

Activity Videos