सामाजिक कार्ये

करोनाच्या संकटामुळे निर्माण झालेल्या अडचणीबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला..

करोनाच्या संकटामुळे बँकिंग आणि सहकार क्षेत्रात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. भविष्यात या क्षेत्रांना सावरण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखण्याची गरज आहे. त्याचबरोबर अडचणीतील सूत गिरण्या व साखर कारखान्यांना एनसीडीच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यासह केशरी शिधापत्रिकाधारकांना कायमस्वरुपी धान्य मिळावे यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेकडे दि.१८ एप्रिल २०२० रोजी केली. बँक आणि सहकार क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी, भविष्यात निर्माण होणारे प्रश्‍न आणि उद्योग, व्यवसायांना काय मदत हवी या संदर्भात विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतिश मराठे, राज्य सहकारी बँकेचे चेअरमन विद्याधर अनासकर, माजी महसूल मंत्री तथा आमदार चंद्रकांत पाटील यांच्याशी बँकिंग व सहकारी क्षेत्रातील मान्यवरांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. सध्याच्या काळात सहकारी बँकांसमोर वेगवेगळे प्रश्‍न निर्माण झाल्याचे नमूद करत आरबीआयकडून धोरण ठरविले जात असताना त्यामध्ये सहकारी बँकांची नोंद असत नसल्याबद्दल निदर्शनास आणून दिले. ते म्हणाले, सहकारी बँकांच्या माध्यमातून छोट्या-छोट्या उद्योग व्यवसायांना अर्थसहाय्य दिले जाते. सहकारी बँकांकडून झालेला अर्थपुरवठा जानेवारी ते जून या कालावधीतील थकबाकी जूननंतर उद्योजकांनी तातडीने भरावी, म्हणजे ते एनपीएत राहणार नाहीत असे आरबीआय ने सांगितले आहे. परंतु आजच्या या कठीण काळात सर्वच उद्योग अडचणीत असल्याकारणाने ते कोणालाही शक्य होणार नाही. मे महिन्यात उद्योग सुरु झाल्यानंतर जूनमध्ये लगेचच पैसे भरणे अशक्य असल्याने त्यांना आणखीन तीन महिन्यांनी मुदत द्यावी. सध्याच्या काळात सहकारी बँकांच अडचणीत असल्यामुळे त्या सूत गिरण्या, साखर कारखाने यांना मदत करु शकत नाहीत. त्यामुळे यामध्ये एनसीडी ला सहभागी करुन घेऊन सूत गिरण्यांचे आधुनिकीकरण करुन तेथील कामगारांचे सक्षमीकरण करण्यासह त्यांना उभारी द्यावी. त्याचबरोबर साखर कारखान्यांनाही मदतीचा हात द्यावा म्हणजे कारखानदारी टिकेल असे सांगितले. सध्या साखर कारखान्यांचे गळीत हंगाम संपले असले तरी लॉकडाऊनमुळे असंख्य कामगार अडकून पडले आहेत. तर गुरुवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे या कामगारांचे हाल आणि नुकसान झाले आहे. कामगारांना गावाकडे जाण्याची ओढ लागली असून त्यांना परत पाठविण्यात संदर्भात योग्य तो मार्ग काढावा असे सूचित केले. केशरी कार्डधारकांनाही रेशन दुकानातून धान्य मिळणार आहे. ते येथून पुढच्या काळातही कायमस्वरुपी मिळावी यासाठी आपण शासन दरबारी प्रश्‍न उपस्थित करुन तो तडीस न्यावा अशी विनंती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली. त्याचबरोबर अंत्योदय व प्राधान्य केशरी कार्डधारकांप्रमाणे सर्व केशरी कार्डधारकांना केंद्र सरकारकडून मोफत 5 किलो तांदूळ मिळावा याप्रश्‍नी केंद्राकडे पाठपुरावा करावे असे सांगितले. तसेच मतदारसंघात लाखो मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले असून दररोज 6500 लोकांना फुड पॅकेट दिले जात असल्याचे सांगून आणखीन काही मदतीची अपेक्षा असेल तर सूचवावे सांगितले.

Activity Photos

Activity Videos