सामाजिक कार्ये

मल्टीपार्टी वीज कनेक्शन संदर्भात येत असलेल्या तांत्रीक अडचणीबाबत महावितरणचे संचालक मा.दिनेश साबू यांच्याबरोबर महत्वपूर्ण चर्चा केली.

२१ जानेवारी २०२० रोजी एच.पी. खालील मल्टीपार्टी वीज कनेक्शन संदर्भात येत असलेल्या तांत्रीक अडचणीबाबत महावितरणचे संचालक मा.दिनेश साबू यांच्याबरोबर महत्वपूर्ण चर्चा करून परिपत्रक क्र. ३२० मधील तांत्रीक अडचणी दूर करून नविन परिपत्रक त्वरीत काढणेत यावे अशे निवेदन केले. यावेळी इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनचे अध्यक्ष मा.सतीश कोष्टी व महावितरणच्या मुख्य कार्यालयातील कार्याकारी अभियंता (वाणिज्य) मा.अमोल मोरे उपस्थित होते.. जानेवारी २०१९ पासून २७ एच.पी. बरील वीज बिलाच्या दरामधील रू. १.२२ अनुदान कमी केल्यामुळे २७ एच.पी.वरील यंत्रमागाचे बीज बिल वाढून येत आहे. यामुळे २७ एच.पी.खालील व वरील यांच्या कापड उत्पादन खर्चामध्ये फार मोठी तफावत येत असलेने कापड विक्रीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत. यासंदर्भात इचलकरंजी पॉवरलुम असोसिएशनने वेळोवेळी महावितरणच्या मुंबईस्थित मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून वरील बाब निदर्शनास आणून दिली. याचे फलित म्हणून महावितरणने वाणिज्य परिपत्रक क्र. ३२० काढले. या परिपत्रकानुसार २७ एच.पी.खालील एकाच कारखान्यामध्ये ५० पर्यंत मल्टीपार्टी कनेक्शन देणे विद्युतभार कमी करणे शक्य होणार होते परंतू इचलकरंजी व कोल्हापूर महावितरणच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी काही तांत्रीक मुद्दे उपस्थित करून विद्युत जोडणीमध्ये बदल करून देणे टाळले होते. यामुळे इचलकरंजीतील अनेक यंत्रमागधारकांना अडचण निर्माण झाली होती. याकामी आज महावितरणचे संचालक मा.दिनेश साबू यांची मुंबई येथील मुख्य कार्यालयात भेट घेऊन याप्रश्‍नाचे गांभिर्य अधोरेखित करून त्वरीत नविन परिपत्रक काढणेबद्दल विनंती केली. यावेळी महावितरणचे संचालक मा.साबू यांनी लवकरात लवकर नविन परिपत्रक काढले जाईल व त्यातून अडचणींचे सर्व तांत्रीक मुद्दे नाहिसे होतील असे आश्‍वासन दिले.

Activity Photos

Activity Videos