सामाजिक कार्ये

II छत्रपती शिवाजी महाराज की जय II इचलकरंजीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगत असणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकास "छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक" असे नाव द्यावे, हि मागणी बस स्थानकाच्या जन्मापासून इचलकरंजीवासीयांची आहे.

II छत्रपती शिवाजी महाराज की जय II इचलकरंजीतील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यालगत असणाऱ्या मध्यवर्ती बसस्थानकास "छत्रपती शिवाजी महाराज बसस्थानक" असे नाव द्यावे, हि मागणी बस स्थानकाच्या जन्मापासून इचलकरंजीवासीयांची आहे. १९ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवजयंती दिनी काही शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी या बस स्थानकावर "छत्रपती शिवाजी महाराज बस स्थानक" असा फलक लावला होता. त्यादिवशी त्याबाबतची माहिती बसस्थानक प्रमुखांना देत या संदर्भात शासनाला माहिती कळवावी बसस्थानकाचे नामांतर करण्यासंदर्भात आपण शासनदरबारी प्रयत्न करून मंजुरी आणू असे सांगितले होते. असे असताना फलक का काढण्यात आला, ज्यांना आपण दैवत मानतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा फलक कल्पना न देता हटविला ही दुर्दैवी बाब आहे. या संदर्भात आज इचलकरंजी मध्यावर्ती बस स्थानकाला छत्रपती शिवाजी महाराज नामांतरण करावे यासाठी बस स्थानकावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा गृह व परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याशी संपर्क साधला असता मंगळवार दि. २ मार्च रोजी या प्रश्नावर मंत्रालयात अधिकारी व मंत्र्यांसमवेत मिटिंग घेऊन निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर आंदोलनाची सांगता केली. यावेळी शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos