सामाजिक कार्ये

इचलकरंजी शहरात दैनंदिन 120 टन कचरा गोळा होतो. त्या कचर्‍यावर दररोज प्रक्रिया होत नसल्याने कचरा डेपोवर कचर्‍याचे मोठे ढिग साचले आहेत. त्याला वारंवार आग लागत असल्याने धुराचे लोट परिसरात पसरून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कचरा डेपोची पाहणी केली.

इचलकरंजी शहरात दैनंदिन 120 टन कचरा गोळा होतो. त्या कचर्‍यावर दररोज प्रक्रिया होत नसल्याने कचरा डेपोवर कचर्‍याचे मोठे ढिग साचले आहेत. त्याला वारंवार आग लागत असल्याने धुराचे लोट परिसरात पसरून नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर कचरा डेपोची पाहणी केली. कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी शासनाकडे पाठवलेला प्रकल्प लवकरात लवकर मंजुुर व्हावा व शहरातील रस्ते, पाणी, कचरा आणि आरोग्याचा प्रश्‍न याबाबत 12 फेब्रुवारी रोजी नगरपालिकेत बैठक आयोजित केली आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, पाणीपुरवठा सभापती दिपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, नगरसेवक सुनील पाटील, विठ्ठल चोपडे, प्रकाश दत्तवाडे, माजी नगराध्यक्षा रत्नप्रभा भागवत, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब कलागते, आरोग्य अधिकारी डॉ. सुनीलदत्त संगेवार, आरोग्य निरीक्षक विजय पाटील, डॉ. कोळी, प्रकाश मोरे, बाळासाहेब पाटील, सचिन वरपे, अनिकेत चव्हाण, बिलाल पटवेगार, मित्तू सूर्यवंशी, रामा नाईक, रामा पाटील, जीवन कोळी, समाधान नेटके व भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos