सामाजिक कार्ये

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंचगंगा नदीची पाहणी करुन प्रदुषणसंदर्भात माहिती जाणून घेतली

१० एप्रिल २०२० रोजी - कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर पंचगंगा नदीची पाहणी करुन प्रदुषणसंदर्भात माहिती जाणून घेतली. महिन्याभरापासून शहर आणि परिसरातील सर्वच उद्योगधंदे बंद राहिल्याने दैनंदिन होणार्‍या औद्योगिक प्रदुषणात मोठ्या प्रमाणात घट होऊन मोठ्या प्रमाणात पाणी स्वच्छ झाल्याचे दिसून आले. लॉकडाऊनमुळे नदीतून होणारा पाणी उपसा पूर्णत: ठप्प झाला आहे. त्याचबरोबर जनावरे, धुणे, कपडे धुणे यालाही आळा बसला आहे. तसेच उद्योगधंदेही बंद असल्यामुळे नदीच्या प्रदुषणात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले. पंचगंगा नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात स्वच्छ झाले असल्याचे निदर्शनास आले. यावेळी प्रकाश दत्तवाडे, बाळासाहेब कलागते आदी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos