सामाजिक कार्ये

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वीज तोडणी संदर्भात सर्व घटकांना एकत्र घेवून चर्चा करण्याचे आश्‍वासन देत वीज तोडणी केली जाणार नाही असे सांगितले. होते. पण अधिवेशन संपताच महावितरण कंपनीकडून थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. या संदर्भात येथील महावितरण कंपनी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सोमाण्णा कोळी यांची भेट घेत जोपर्यंत शासन स्तरावर निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडू नये अशा मागणीचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नांवचे निवेदन सादर केले. तसेच थकबाकीदारांना 2 टक्के रक्कम भरुन मंजूरीनंतर 30 टक्के रक्कम भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वीज तोडणी संदर्भात सर्व घटकांना एकत्र घेवून चर्चा करण्याचे आश्‍वासन देत वीज तोडणी केली जाणार नाही असे सांगितले. होते. पण अधिवेशन संपताच महावितरण कंपनीकडून थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले जात आहे. या संदर्भात येथील महावितरण कंपनी विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता सोमाण्णा कोळी यांची भेट घेत जोपर्यंत शासन स्तरावर निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडू नये अशा मागणीचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या नांवचे निवेदन सादर केले. तसेच थकबाकीदारांना 2 टक्के रक्कम भरुन मंजूरीनंतर 30 टक्के रक्कम भरण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोरोना काळात लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग, व्यवसाय, कंपन्या बंद राहिल्याने संपूर्ण व्यवहार, उत्पादन ठप्प झाले होते. यामध्ये सर्वांचीच विशेषत: हातावर पोट असणार्‍या कष्टकरी, कामगार व छोट्या व्यावसायिकांची वाताहात झाली. या लॉकडाऊन काळात वीज सवलतीबाबत शासनानेच पाचवेळा घोषणा केली. पण अंमलबजावणी केली नाही. आम्हीही या प्रश्‍नी ताराराणी पक्षाच्या माध्यमातून मोटरसायकल रॅली काढून घरगुती वीज ग्राहकांना प्रतिमहा 100 युनिटपर्यंत सवलत देण्याची मागणी केली होती. या संदर्भात अधिवेशनात चर्चा होईल अशी अपेक्षा होती. पण वेळेअभावी मला या मागण्या सविस्तरपणे मांडता आल्या नाहीत. परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वीज तोडणी संदर्भात सर्व घटकांना एकत्र घेवून चर्चा करण्याचे आश्‍वासन देत वीज तोडणीस स्थगिती दिली होती. पण देयके अदा न करण्यांचे वीज कनेक्शन तोडली जात असतील तर उपमुख्यमंत्र्यांनी दिलेली स्थगिती उठवण्याचा अधिकार फक्त मुख्यमंत्र्यांनाच असताना ऊर्जामंत्री निर्णय कसा घेऊ शकतात, असा सवाल उपस्थित केला. या संदर्भात कार्यकारी अभियंता कोळी यांनी ऊर्जामंत्री यांनीच ही स्थगिती उठविली असल्याचे सांगत त्या संदर्भातील अधिवेशानातील ऊर्जामंत्र्यांचे वक्तव्य ऐकवले. त्यावर 9 मार्च रोजी गोंधळातच अधिवेशानाचे कामकाज पार पडल्याचे सांगत या गोंधळात ऊर्जामंत्री काय बोलले, त्यांनी काय सांगितले हे कोणालाच कळाले नाही. एकिकडे सवलत देण्याचे सांगत दुसरीकडे वीज तोडणी केली जात आहे. अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा न करुन राज्य शासनाने समस्त लोकप्रतिनिधींची चेष्टा चालविली असल्याचे सांगत या प्रकाराचा निषेध नोंदवला. तसेच या प्रश्‍नी आता रस्त्यावर उतरुन संघर्ष करण्यात येणार असून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही असा इशारा दिला. कोणत्याही वीज ग्राहकाचे कनेक्शन तोडू नये अशा सूचनाही केल्या. यावेळी ताराराणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, प्रकाश मोरे, बाळासाहेब कलागते, अहमद मुजावर, एम. के. कांबळे, सुनिल पाटील, महावीर कुरुंदवाडे, नितेश पोवार, शंकर येसाटे, नरसिंह पारीक आदी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos