सामाजिक कार्ये

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा...

दि.३ मे रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला यावेळी बाहेरून येणाऱ्या नागरिकांचे घरी अलगीकरण करायचे की संस्थात्मक अलगीकरण करायचे याबाबत निर्णय घ्यायचा अधिकार ज्या त्या गावांना द्यावे. त्याचबरोबर गावं लॉकडाऊन करण्याची जबाबदारीही संबधीत गावांना द्या. त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या लोकांवर गावे अधिक चांगल्या पध्दतीने लक्ष ठेवतील, अशी मागणी केली. यावेळी बैठकीत पालकमंत्री सतेज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार संजय मंडलिक,खासदार धैर्यशील माने, जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख, आमदार ऋतुराज पाटील, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ अमन मित्तल यांच्यासह आमदार, विविध गावचे सरपंच यांनी सहभाग घेतला.

Activity Photos

Activity Videos