सामाजिक कार्ये

वीज दरवाढ विरोधी प्रचंड मोर्चा व होळी आंदोलन

1 फेब्रुवारी २०२० गेली चार-पाच वर्षे जागतिक मंदी असल्यामुळे सर्व उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत असताना वेळोवेळी होणारी वीजदरवाढ चालूच आहे. वीज दरवाढ प्रस्तावाचा प्रचंड मोठा फटका ग्राहक, लघुउद्योग ग्राहक व यंत्रमागधारक, व्यापारी ग्राहक यांना बसणार आहे. यासाठी इचलकरंजी यंत्रमाग व औद्योगिक #संघटना समन्वय समिती च्या वतीने महावितरण कार्यालयावर वीज दरवाढ विरोधी प्रचंड मोर्चा व होळी आंदोलन करण्यात आले. शाहू पुतळ्यापासून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्टेशन रोड मार्गे महावितरण कार्यालयावर निघालेल्या या मोर्चास इचलकरंजीतील सर्वपक्ष ,संस्था व संघटना मोठ्या संख्येने सहभागी होऊन प्रचंड प्रतिसाद दिला. मोर्चावेळी सर्वांनी आपापल्या परीने हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करून शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यास प्रसंगी उपोषण करण्यासह आर या पार च्या लढाईसाठी सज्ज व्हावे,असा निश्चय प्रस्थापित केला. तसेच चार वर्षापूर्वी तत्कालीन वस्त्रोद्योग मंत्र्यांनी वीज दरात 1 रुपया आणि कर्जावरील व्याज दरात 5 टक्क्यांची सवलत देण्याची घोषणा केली होती. परंतु त्याची अंमलबजावणी केली नाही. साध्या मागाला 1 रुपया वीज सवलत देताना आधुनिक यंत्रमागधारकांना झटका दिला. म्हणूनच 27 अश्‍वशक्ती वरील आणि 27 अश्‍वशक्तीखालील अशी असलेली वर्गवारी रद्द करण्यासह सर्वांनाच मल्टिपार्टी कनेक्शन देण्याची मागणी केली. आणि मल्टिपार्टी संदर्भात माहिती घेण्याचे काम सुरु असून येत्या पंधरा दिवसात त्याबाबतचा निर्णय होईल . नवीन दरवाढ भयावह असून त्याला विरोध करणे गरजेचे आहे. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात साध्या मागाला वीज दरात 1 रुपया कमी केला तर सुमारे अडीच कोटी रुपयांचा तर आधुनिक मागासाठी 1.22 रुपये दिल्यास 9 कोटी रुपयांचा बोजा वाढणार आहे. असे मिळून संपूर्ण राज्यात 500 कोटी रुपयांचा बोजा वाढणार असून महावितरणसाठी ती अशक्य गोष्ट नसल्याचे नमुद केले.

Activity Photos

Activity Videos