सामाजिक कार्ये

पंचगंगा नदी प्रदूषण विषय आढावा बैठक घेतली.

पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. यासाठी जिल्ह्याच्या विविध समस्यांसंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दि. 16 मार्च रोजी कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक विधान भवन येथे होत आहे. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय येथे दि.९ मार्च २०२० रोजी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफसो ,पालकमंत्री सतेज पाटील आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील -यड्रावकर यांच्या समवेत आढावा बैठक घेतली. या बैठकी दरम्यान जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणाचा विषय मुख्यमंत्री यांच्याकडे मांडला जाईल, असे आश्वासन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. तर अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा आणि नगरोत्थानमधून रस्त्यांसाठी निधीचा विषय मार्गी लावू,असे आश्वासन पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिले. यावेळी पंचगंगा नदी प्रदूषणासोबत अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी माझ्या समवेत खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रकांत जाधव,आमदार राजेश पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते. -Prakash Awade -प्रकाश आवाडे

Activity Photos

Activity Videos