सामाजिक कार्ये

कबनूर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपंचायत मध्ये व्हावे,यासाठी कबनूर ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषणास पाठींबा

25 जानेवारी २०२० कबनूर गावाचा विस्तार वाढत असून लोकसंख्या 50 ते 55 हजारच्या आसपास गेली आहे. त्यामुळे कबनूर ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या मुलभूत गरजा पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. ग्रामविकास निधी हा पाणीपुरवठा योजनेवर खर्च होत आहे. सध्या असणारी “जलस्वराज्य योजना" ही मुदतबाह्य ठरत आहे. पाणी पुरवठा योजना सक्षम होणे व मुबलक पाणी गावाला मिळणे गरजेचे आहे. तसेच #गावविकास आराखडा वाढीव वस्त्यांमुळे सुनियोजित करणे #ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर आहे. तसेच घणकचरा उठाव व कचऱ्याची विल्हेवाट लावणे अशक्य आहे. गावात खेळाचे मैदान, बागबगीचा या सुख-सुविधाही ग्रामपंचायत पुरवू शकत नाही. ग्रामपंचायतीमध्ये रोजगारीवर असणाऱ्या कामगारांचे पगार नियोजन ग्रामपंचायत करु शकत नाही. घरफाळा, पाणीपट्टी, इत्यादी कर मुलभूत नागरी सुविधा मिळत नसलेने करदाते कर भरण्यास असमर्थता दर्शवितात त्यामुळे कर गोळा होत नाही. गावातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी अद्यावत दवाखाना गरजेचा आहे. वाहतूक कोंडीमुळे होणारे त्रास, अपघातापासून मुक्‍ती मिळण्यासाठी पर्यायी रस्त्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. या सर्व सुविधा ग्रामपंचायतीच्या आवाक्या बाहेर आहे. ग्रामपंचायतीचे रुपांतर #नगरपंचायत मध्ये व्हावे, यासाठी कबनूर ग्रामस्थांच्या वतीने साखळी उपोषणास उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला. तसेच कबनूर नगरपंचायत झाल्याशिवाय यावर्षी मे महिन्यात होणारी कबनूर ग्रामपंचायत निवडणूक होणार नाही असा विश्वास दिला. तसेच २६ जानेवारी २०२० रोजी होणाऱ्या ग्रामसभेमध्ये हा ठराव एकमुखी मंजूर करण्यात येईल आणि या मागणीमध्ये येणाऱ्या सर्व अडचणीमध्ये मदत करण्याची ग्वाही दिली.

Activity Photos

Activity Videos