सामाजिक कार्ये

खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांबाबत वेबेक्स दूरचित्रवाणी परिषदेद्वारे आढावा..

दि.२९ एप्रिल २०२० रोजी खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतकर्‍यांना दिवसा जादा चार तासांचा वीजपुरवठा करण्यात यावा. त्याचबरोबर ठिबक सिंचनासाठी अनुदान वाढवून देण्याची मागणी करतानाच जिल्ह्यातील शेतकर्‍यांची शेततळ्यांची मोठी मागणी असून अनुदानाअभावी ही मागणी पूर्ण होवू शकत नाही, याकडे लक्ष द्यावे अशी मागणी पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून वेबेक्स दूरचित्रवाणी परिषदेद्वारे आढावा घेतला. शेतकर्‍यांना शेतीसाठी रात्रीचा वीज पुरवठा केला जातो. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊनमुळे सर्वच उद्योग व्यवसाय बंद आहेत. त्यामुळे वीजेचा वापर मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर शेतीसाठी दिवसा जादाचा 4 तासांचा वीज पुरवठा करण्यात यावा. ठिबक सिंचनसाठी मिळणारे अनुदान वाढवून देण्यात यावे. त्यासाठी कोणत्याही प्रकारची मर्यादा असू नये. तसेच हार्वेस्टिंग मशिनसाठी अनुदान दिले जात नसून ते तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी केली.

Activity Photos

Activity Videos