सामाजिक कार्ये

अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगातील समस्या संदर्भात बैठक घेऊन मदत करण्यासंबंधी उपमुख्यमंत्री मा.अजित पवार यांची भेट ...

12 फेब्रुवारी २०२० रोजी मुंबई मंत्रालय येथे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांची अडचणीत असलेल्या वस्त्रोद्योगातील समस्या संदर्भात बैठक घेऊन उद्योगास मदत करण्यासंबंधी भेट घेतली. मागील काही वर्षांपासून राज्यातील वरत्रोद्योग विविध कारणांनी अडचणीत सापडला आहे. राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या सवलतींचा निर्णय करण्यात आला होता,परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालेली नाही. #वस्त्रोद्योग व्यवसाय मोठ्या संकटातून मार्गक्रमण करीत असल्याने यंत्रमाग धारकांवर व त्यावर अवलंबून असणाऱ्या यंत्रमाग कामगारांवर व इतर उद्योगांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. हीच परिस्थिती राहिल्यास येणाऱ्या काही महिन्यात यंत्रमाग व्यवसाय पूर्णतः मोडकळीस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या वस्त्रोद्योगाला सावरण्यासाठी त्यासंबंधीची बैठक घेऊन यातून योग्य तो मार्ग काढावा व या उद्योगाला मदत करावी, अशी मागणी #उपमुख्यमंत्री मा.ना.श्री.अजितदादा पवार यांच्याकडे केली.

Activity Photos

Activity Videos