सामाजिक कार्ये

छत्रपती शाहू हायस्कूल,इचलकरंजी सुवर्ण महोत्सवी आणि माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळ्यास उपस्थिती

२८ डिसेंबर २०१९ रोजी छत्रपती शाहू हायस्कूल, इचलकरंजी यंदा ५० व्या वर्षांत पदार्पण करीत असून या सुवर्ण महोत्सवी आणि माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन कार्यक्रम राजीव गांधी भवन येथे माझ्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. शाळेतील मस्ती, एकत्रितपणे केलेला अभ्यास,शाळेतील क्रीडा स्पर्धा, शिक्षकांनी दिलेली शिक्षा, स्नेहसंमेलन आणि त्यातील सांस्कृतिक कार्यक्रमाची धूम अशा विविध विषयांवर माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. शाहू हायस्कूल सुवर्ण महोत्सव आणि माजी विद्यार्थी स्नेहसंमेलन हा कार्यक्रम माझ्या समवेत महाराष्ट्र मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव, इचलकरंजी चे सुपुत्र मा.विकास खारगे आणि खासदार धैर्यशील माने प्रमुख पाहुणे म्हणून कार्यक्रमास उपस्थित राहिले.

Activity Photos

Activity Videos