सामाजिक कार्ये

इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक’ असे नामकरण करावे या मागणीसंदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईत परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मंत्री परब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रश्‍नी लवकरच एक व्यापक बैठक घेऊन निर्णय घेऊन अशी ग्वाही दिली.

इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक’ असे नामकरण करावे या मागणीसंदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकार्‍यांनी मुंबईत परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मंत्री परब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या प्रश्‍नी लवकरच एक व्यापक बैठक घेऊन निर्णय घेऊन अशी ग्वाही दिली. इचलकरंजी येथील मध्यवर्ती बसस्थानक हे इचलकरंजीसह परिसरातील गावे व सीमाभागासाठी मध्यवर्ती ठिकाण आहे. या परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्‍वारुढ पुतळा आहे. याठिकाणी अ.भा. मराठा महासंघाच्यावतीने दररोज नित्य नियमाने साफसफाई, पुजा-अभिषेक केला जातो. त्यामुळे मध्यवर्ती बसस्थानकाचे ‘छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती बसस्थानक’ असे नामकरण करावे अशी मराठा महासंघाची सातत्याने मागणी आहे. शिवजयंती दिनी या बसस्थानकाच्या प्रवेशद्वारात लावण्यात आलेला फलक उतरविण्यात आल्याने आंदोलन छेडले होते. त्यावेळी पालकमंत्री तथा परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासोबत झालेल्या चर्चेत मंगळवारी बैठक घेण्याचे ठरले होते. परंतु मंत्री पाटील हे आजारी असल्याने मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट घेतली. मंत्री परब यांच्या मुंबई येथील शिवालय मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत वस्तुस्थितीची संपूर्ण माहिती देत बसस्थानकाचे नामकरण करण्यात यावे अशी मागणी केली. यावेळी प्रमुख मुद्यावर चर्चा झाली. त्यामध्ये मंत्री परब यांनी या प्रश्‍नी लवकरच राज्यमंत्री पाटील हे आल्यानंतर एक व्यापक बैठक घेऊन निर्णय घेऊ अशी ग्वाही दिली. या बैठकीत मराठा महासंघाचे अध्यक्ष संतोष सावंत, कार्याध्यक्ष अरुण मस्कर, उत्तम रवंदे, संतोष चव्हाण, रवि शिंदे, विजय मुतालिक, उत्तम पाटील, आनंदा मकोटे, सागर मोळे, उत्तम शेळके, विजय चव्हाण यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos