सामाजिक कार्ये

35 ते 65 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ खेळाडूंच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन व उद्घाटन

जयहिंद मंडळाच्यावतीने शहरात प्रथमच 35 ते 65 वर्षे वयोगटातील ज्येष्ठ खेळाडूंच्या खो-खो स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 31 मे २०१९ ते 2 जून २०१९ या कालावधीत जयहिंद मंडळाच्या कै. अनंत उर्फ ए. बी. पवार क्रीडानगरीत ही स्पर्धा संपन्न झाली. प्रारंभी ज्येष्ठ राष्ट्रीय खेळाडू तथा माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन तसेच मैदानाचे श्रीफळ वाढवून पुजन करुन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.

Activity Photos

Activity Videos