सामाजिक कार्ये

कोरोनाच्या महामारीमुळे वास्त्रोद्यागाला आलेल्या अनेक अडचणीबाबत बैठक...

इचलकरंजी शहर हे महाराष्ट्रातील वस्त्रोद्योगाचे एक प्रमुख शहर आहे. कोरोनाच्या महामारीमुळे वास्त्रोद्यागाला मोठा फटका बसला आहे. त्यातच इचलकरंजी शहर व परिसरातील किमान ४० हजार कामगार हे वेग-वेगळ्या राज्यात निघून गेलेले आहेत. या अशा परिस्थितीत यंत्रमाग उद्योग पूर्ण क्षमतेने चालू करणे अत्यंत अवघड बनले आहे. यंत्रमाग उद्योग चालू करणेसाठी येणाऱ्या अडचणी व शासनाकडून लागणारी मदत याबाबत इचलकरंजी शहर व परिसरातील सर्व यंत्रमागधारक संघटनांची बैठक २७ मे २०२० रोजी घेतली. या बैठकीत अनेक उद्योजकांनी बँकेकडून मोठ्या प्रमाणात कर्जे घेऊन आपला उद्योग उभा केला आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून हा उद्योग वेगवेगळ्या कारणाने अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. त्यातच नुकत्याच जगावर ओढवलेल्या न भूतो न भविष्यात अशा कोरोनाच्या महामारीमुळे हा उद्योग पूर्णपणे उद्धस्त झाला आहे. रिझर्व बँकेने दिलेल्या सुचनेमध्ये कोरोनाच्या परिस्थितीमध्ये उद्योजकांनी घेतलेल्या कर्जावरील व्याज हे त्यांनी ६ महिन्यानंतर भरावेच लागणार आहे. परंतू आधीच आर्अथिक अडचणीत असलेल्या उद्योजकाला व्याजाची रक्कम भरणे शक्य नसलेने त्याचे व्याज राज्य शासनाने भरावे. यापूर्वीच राज्य शासनाने सर्व प्रकारच्या यंत्रमागधारकांना ५% व्याज अनुदान देणेचे जाहीर केले होते. पण त्याची अंमलबजावणी अद्याप पर्यंत झालेली नाही. ती त्यांनी तातडीने करावी. यंत्रमागधारकांच्या २७ एच.पी. वरील वीज दरामध्ये बजेटमध्ये जाहीर केलेली ७५ पैशांची सवलतीची अजूनपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. ती तातडीने करावी. तसेच २७ एच.पी. खालील यंत्रमागधारकांना वीज दरामध्ये रू. १ प्रती युनिटचे सवलत मिळावी असे सर्व संघटनांच्या वतीने राज्य सरकारकडे मागणी केली.

Activity Photos

Activity Videos