सामाजिक कार्ये

कोरोनाच्या काळातील व वस्त्रोद्योग आणि महापूर संदर्भातील समस्या मांडून चर्चा केली.

दि.१ जुलै २०२० रोजी महाराष्ट्र राज्याचे ऊर्जामंत्री मा.ना. नितीन राउत यांच्यासोबत कोल्हापूर जिल्ह्यातील खासदार, आमदार आणि महावितरण अधिकारी यांच्या समवेत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ऑनलाईन बैठक झाली. या बैठकीत कोरोनाच्या काळातील व वस्त्रोद्योग आणि महापूर संदर्भातील महावितरणाच्या संबंधित येणाऱ्या समस्या मांडून चर्चा केली. या बैठकीत खालील मुद्दे मा.ऊर्जामंत्री यांच्यासमोर मांडले. 1) साध्या यंत्रमागाला 1 रुपया सवलत, 40 पैसे तसेच अतिरिक्त 75 पैसे सवलतीच्या निर्णयाची अंमलबजावणी यासह सर्वच इंडस्ट्रीजच्या स्थिर आकाराला स्थगिताऐवजी तो रद्द करण्यात यावा . 2) 27 अश्‍वशक्ती वरील उद्योगांना अतिरिक्त 75 पैसे सवलत देण्याचा निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी. ३) साध्या यंत्रमागाला 1.22 रुपये वीज दर असताना त्यामध्ये 1 रुपया सवलत लागू करण्यात यावी. ४) इंडस्ट्रीजमध्ये कोरोना संकटामुळे मोठी आपत्ती आली आहे. त्यांचा स्थिर आकार 6 महिने स्थगित ठेवण्यात आला आहे. तो स्थगितऐवजी रद्द करण्यात यावा. ५) पॉवर फॅक्टरमध्ये केव्हीएस निर्णयामुळे त्रास सहन करावा लागत असून हा निर्णय किमान एक वर्षांसाठी पुढे ढकलण्यात यावा. कॅपटीव्ह पॉवरसाठी लागू 1.20 रुपयांचा अतिरिक्त सरचार्ज रद्द करण्यात यावा. ६) शेतकर्‍यांच्या समस्या व तक्रारीकडे लक्ष देण्याची गरज असून पुराच्या पार्श्‍वभूमीवर ट्रान्सफॉर्मर बदलणे, खराब झालेले विजेचे खांब बदलणे याला प्राधान्य मिळावे, असेही सांगितले.

Activity Photos

Activity Videos