सामाजिक कार्ये

इचलकरंजी शहरातील स्मशानभूमी पार्कींग प्रश्न...

२ जानेवारी २०२० - इचलकरंजी शहरातील गेल्या साडे चार वर्षांपासून प्रलंबित असलेला स्मशानभूमी पार्कींग प्रश्नासाठी इचलकरंजी नागरिक मंचच्या सदस्यांनी माझी भेट घेतली. स्मशानभूमी पार्कींग प्रश्न गेल्या साडेचार वर्षात लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत असुन काम पुर्ण होत नसल्याचे मत इचलकरंजी नागरिक मंचच्या सदस्यांनी व्यक्त केले. त्यावेळी लगेच स्मशानभूमीत जाऊन तेथील झालेले काम व प्रलंबित कामाची प्रत्यक्ष माहिती घेतली. तेथूनच इचलकरंजी नगरपरिषद मुख्याधिकारी दीपक पाटील यांच्याशी फोनवरून संपर्क साधुन त्वरित कामाचे टेंडर काढुन काम पुर्ण करण्याची सुचना मुख्याधिकारी यांना केली.नगरपालिकेस सुचना केलेली आहे वेळ पडली तर आमदार फंडातून काम करून देऊ असे आश्वासन त्यांना दिले.इचलकरंजी शहराच्या प्रश्नासाठी मी कटिबद्ध असुन वेळोवेळी माझ्या निदर्शनास समस्या आणुन देण्याची सुचना इचलकरंजी नागरिक मंचच्या सदस्यांना केली.

Activity Photos

Activity Videos