सामाजिक कार्ये

आमदार फंडातून नगरपरिषदेकडील 1241 कर्मचार्‍यांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा उतरविण्याची घोषणा ...

कोरोना विषाणूच्या पार्शवभूमीवर संपूर्ण देश कोरोनाच्या विरोधात लढाई करत आहे. संपूर्ण आरोग्य विभाग या लढाईत अग्रभागी राहिला आहे. त्याचबरोबर इचलकरंजी नगरपरिषदेतील 1241 कर्मचारी अहोरात्र जीवाची पर्वा न करता कोरोनाला हरविण्यासाठी झटत आहेत. या कर्मचार्‍यांना कोणत्याही प्रकारचे संरक्षण नसल्याचे त्यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. या प्रश्‍नी पुढाकार घेतला आहे. त्याच अनुषंगाने नगरपरिषदेच्या सभागृहात आयोजित बैठकीत आमदार फंडातून नगरपरिषदेकडील 1241 कर्मचार्‍यांचा प्रत्येकी 10 लाख रुपयांचा विमा उतरविण्याची घोषणा केली. हा विमा एक वर्षासाठी असणार आहेत. या निर्णयामुळे कर्मचारी वर्गाला मोठा दिलासा मिळेल. त्याचबरोबर शहरातील दैनंदिन साफसफाई व कचरा उठावाचे काम करणार्‍या कर्मचार्‍यांना कसलेही संरक्षक किट नसल्याची बाब लक्षात आल्यानंतर सर्व कर्मचार्‍यांसाठी पीपीई किट तयार करुन घेतले. नगरपरिषदेकडील 650 आणि कंत्राटी 350 अशा एक हजार कर्मचार्‍यांना हे किट देण्यात येणार आहे. प्रातिनिधीत स्वरुपात हे पीपीई किट नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी यांचेकडे सुपूर्द केले.

Activity Photos

Activity Videos