सामाजिक कार्ये

फार्सी -पारधी समाजास हक्काची घरे मिळवून देणार..

इचलकरंजी मधील फार्सी -पारधी समाजबांधवांचे प्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत . ते प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावेत, यासाठी आज फार्सी -पारधी समाज अध्यक्ष मोहन काळे आणि समाज बांधवांनी २८ डिसेंबर २०१९ रोजी माझी भेट घेतली . फार्सी -पारधी समाजाच्या राहण्याच्या जागेवर आदिवासी कोट्यातून घरकुल बांधून मिळावे यासाठी नगरपालिकेने त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. व झोपडपट्टीवासियांना जागा देऊन त्यांचे पुनर्वसन व्हावे. तसेच समाजाच्या जागेवर सांस्कृतिक भवन बांधून मिळावे ,आणि हि कामे मार्गी लावावी. अशी मागणी फार्सी-पारधी समाजबांधवानी केली. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी सोमवार दि. ३० डिसेंबर २०१९ रोजी इचलकरंजी नगरपालिकेत समाजासमवेत अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीतून फार्सी-पारधी समाजाला न्याय मिळावा यासाठी मी प्रयत्नशील राहील.

Activity Photos

Activity Videos