सामाजिक कार्ये

आशा आरोग्य सेविकांना आर्थिक सहाय्य..

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कामात इचलकरंजी येथे 41 आशा आरोग्य सेविका अविरतपणे कार्यरत आहेत. शहरातील ‘घर टू घर’ सर्व्हे करुन माहिती संकलनाचे काम करत आहेत. ही सर्व कामे करताना त्यांना कोणतेही मानधन मिळत नव्हते. त्यामुळे आशा आरोग्य सेविकांना आर्थिक अरिष्टाला तोंड द्यावे लागत होते. त्यांच्या समस्या जाणून घेत २० मे २०२० रोजी जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 41 आशा आरोग्य सेविकांना आर्थिक सहाय्य देऊन मोठा आधार दिला.

Activity Photos

Activity Videos