सामाजिक कार्ये

"बाल गुन्हेगारी रोखा व समाज सुरक्षित करा." जनजागृती मोहिमेस पाठींबा...

२६ जानेवारी २०२० रोजी "बाल गुन्हेगारी रोखा व समाज सुरक्षित करा." या संकल्पनेवर आधारित युवकांची जनजागृती मोहीम इचलकरंजी प्रांत कार्यालयासमोर पार पडली. इचलकरंजी शहर परिसरात गुन्हेगारी विश्वात आलेल्या सर्व रेकॉर्ड वरील अल्पवयीन मुलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अशा १६ ते १८ वयोगटातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या मुलांना त्यांचे गुन्हेगारी कृत्यापासून परावृत्त करणेसाठी बालन्याय अधिनियम- २०१५ नुसार काही तरतुदी केलेल्या आहेत. पण अशा तरतुदींचा गैरवापर करून १८ वर्षाखालील मुले हि वारंवार चोरी,मारामारी,खंडणी,खून,दरोडा,बलात्कार यासारखे गंभीर गुन्हे करीत असतात. अशा सर्व बाल गुन्हेगारांना बालगुन्हेगारी पासून परावृत्त करायचे असेल तर बालकल्याण नियमानुसार १८ वर्षावरून १६ वर्ष करण्यात यावे,अशी मागणी ईश्वर बहुउद्देशीय सेवा संस्था, इचलकरंजी तर्फे करण्यात आली. या मागणीवर जनजागृती मोहिमेस पाठींबा दिला .आणि निवेदनावर सही करून या मागणीला प्रतिसाद दिला.

Activity Photos

Activity Videos