सामाजिक कार्ये

उपविभागीय अधिकारी कार्यालय इचलकरंजी येथे जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याबाबत बैठक घेण्यात आली.

आज उपविभागीय अधिकारी कार्यालय इचलकरंजी येथे मुख्याधिकाऱ्यांच्या समवेत जगभरामध्ये थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याबाबत बैठक घेण्यात आली. कोरोना विषाणू संपूर्ण जगात वेगाने पसरत आहे. महाराष्ट्रामध्येही काही भागात कोरोना वायरस पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यासाठी केंद्रसरकार आणि राज्यसरकार मार्फत ३१ मार्च पर्यंत सार्वजनिक ठिकाणे बंद करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, तो निर्णय हातकणंगले तालुका व इचलकरंजी शहरामध्ये ३१ मार्च पर्यंत लागू करण्यात येणार आहे. तसेच हातकणंगले तालुक्यामध्ये २१ व इचलकरंजी शहरामध्ये मध्ये २१ प्रवासी असे एकूण ४२ प्रवासी बाहेरून आलेले आहेत. त्यांच्यावर प्रशासनाचे व आरोग्य विभागाचे लक्ष आहे. दैनंदिन त्यांच्याशी संपर्क करून विचारपूस केली जाते. त्यांचा संसर्ग होऊ नये यासाठी त्यांची वेगळी सोय करून त्यांची काळजी घेतली जाईल, असे दिले. तसेच ही बैठक उपविभाग अधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार श्री. प्रदीप उबाळे, अप्पर तहसीलदार श्री.मैमुनिस्सा सनदे, गटविकास अधिकारी अरुण जाधव, मुख्याधिकारी दीपक पाटील. नायब तहसीलदार उदयसिंह गायकवाड, पाणीपुरवठा सभापती महेश पाटील यांच्या समवेत पार पडली. तसेच,खालील काही महत्त्वाचे निर्णय हातकणंगले तालुक्यात व इचलकरंजी शहरामध्ये ३१ मार्च पर्यंत लागू करण्यात येणार आहे.

Activity Photos

Activity Videos