सामाजिक कार्ये

शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी पंचगंगा नदीवरील जॅकवेलसह कट्टीमोळा डोहाची पाहणी...

शहराला दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासंदर्भात पंचगंगा नदीवरील जॅकवेलसह कट्टीमोळा डोह येथे ९ जून २०२० रोजी भेट देऊन पाहणी केली. पंचगंगा आणि कृष्णा अशा दोन ठिकाणाहून इचलकरंजी शहराला पाणी पुरवठा केला जातो. कृष्णा आणि पंचगंगा नदीतून शहराला पुरेसा पाणी उपसा होतो. त्यामुळे शहराला दररोज पाणी देण्याचा प्रयत्न केला जात आहे. लॉकडाऊन काळात पंचगंगा नदी बहुतांशी प्रदुषणमुक्त झाली असून ती आपल्याला तशीच प्रदुषणमुक्त ठेवायची आहे. शहरातील उद्योग, व्यवसाय टिकला पाहिजे, पण त्यासाठी प्रदुषण टाळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजनाही अंगिकारल्या पाहिजेत. कट्टीमोळा डोहातील पाणी प्रदुषणमुक्त असून तेथून सबमर्सिबल पंपाद्वारे पाणी उपसा करुन ते जॅकवेलमध्ये आणून शहरवासियांना दररोज पाणी देण्याचा प्रयत्न आहे. तसेच विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत करुन एकदिवसआड पुरवठा सुरु केला जात आहे. या संदर्भात सातत्याने चर्चा सुरु असून दररोज पाणी देण्यात निश्‍चितपणे यश मिळेल.

Activity Photos

Activity Videos