सामाजिक कार्ये

इचलकरंजीत 100 शुध्द पेयजल प्रकल्प उभारण्यास शासनाने 4 कोटी रुपयांची निधी मंजूर केला...

इचलकरंजी शहराला भेडसावणारा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी इचलकरंजीत 100 शुध्द पेयजल प्रकल्प उभारुन त्याद्वारे पिण्यासाठी व अन्न शिजवण्यासाठी 24 तास पाणी उपलब्ध करुन देण्याबाबत शासन दरबारी पाठपुरवठा सुरु केला होता. त्याला यश मिळाले असून शासनाने 4 कोटी रुपयांची निधी मंजूर केला आहे. शहराला पंचगंगा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांतून पाण्याचा पुरवठा केला जातो. परंतु पंचगंगा प्रदुषित झाल्याने आणि कृष्णा योजनेला सतत गळती लागत असल्याने त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे इचलकरंजी शहरात 100 शुध्दपेय जल प्रकल्प उभारण्यात यावेत व त्यासाठी शासनाने वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून निधी उपलब्ध करुन द्यावा सुरु असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. कृष्णा योजना जलवाहिनी बदलाचे कामही अंतिम टप्प्यात आहे. तर लॉकडाऊनच्या काळात प्रदुषण रोखले गेल्याने पंचगंगा नदीही प्रदुषणमुक्त झाली आहे. ती आता यापुढे कदापि प्रदुषित होऊ देणार नाही. शहरातील उद्योगधंदा टिकला पाहिजे त्याचबरोबर या उद्योगांनीही जनतेच्या आरोग्याची काळजी घेऊन झेडएलडी प्रकल्प उभारावा असे सांगितले. शहरात उभारण्यात येणारे 100 शुध्द पेयजल प्रकल्प नगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहेत. कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही ठिकाणाहून उपसा केले जाणारे पाणी या पेयजल प्रकल्पांना पुरविले जाणार असून नागरिकांना 24 तास मोफत शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे शहरवासियांना डबल फिल्टर पाणी मिळणार आहे. भविष्यात नळाद्वारेही 24 तास पाणी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न असून नळांना मीटर बसविले जाणार असल्याचेही सांगितले.

Activity Photos

Activity Videos