सामाजिक कार्ये

अल्टिमेट खो-खो स्पर्धेसाठी निवड झालेल्या इचलकरंजीच्या खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा धनादेश सुपूर्त केला.

इचलकरंजी शहर व परिसराला खो-खो खेळाची पंढरी मानले जाते. बालेवाडी (पुणे) येथे 14 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत संपन्न होणार्‍या अल्टिमेट खो-खो या राष्ट्रीय स्तरावरच्या खो-खो स्पर्धेत देशातून निवडल्या जाणाऱ्या सहा संघांमध्ये इचलकरंजीच्या तब्बल 22 खेळाडूंचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा सत्कार प्रकाश आवाडे क्रीडा अकादमीच्या वतीने डीकेटीई, राजवाडा येथे संस्थेचे अध्यक्ष माजी खासदार सहकारमहर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या समवेत केला. यावेळी निवड झालेले खेळाडू व प्रशिक्षकांना कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने प्रत्येकी 10 हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. इचलकरंजी वस्त्रोद्योगासोबतच क्रीडा क्षेत्रातही अव्वल असेल असा विश्‍वास यावेळी व्यक्त केला. तसेच लवकरच डीकेटीई संस्थेच्या वतीने तारदाळ येथे स्पोर्टस् कॉलेज आणि इचलकरंजीतील नारायण मळा येथे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स सुरु करण्यात येणार असून तेथेही खोखो-कबड्डी-फुटबॉल यांना प्राधान्य असणार आहे, असे यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, जनता बँक संचालक स्वप्निल आवाडे, डीकेटीई सचिव डॉ. सौ. सपना आवाडे, सौ. मोश्मी आवाडे, कोल्हापूर खो-खो असोशिएशनचे अध्यक्ष राजन उरुणकर, प्रा. डॉ.पी.व्ही. कडोले (सर), डीकेटीई संचालक सुनील पाटील, शेखर शहा, कोल्हापूर खो-खो असोशिएशनचे गुंडाप्पा हातरोटे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, हरीहर होगाडे, जी. जी. कुलकर्णी, गोपाळ नागवेकर, हेमंत भांडवले, सुनिल पाटील, श्रीशैल कित्तुरे, तात्या कुंभोजे, राहुल घाट, नरेश हरवंदे, अजिंक्य रेडेकर, अभिजित बचाटे आदींसह खेळाडू, पालक उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos