सामाजिक कार्ये

स्वच्छता कर्मचारी नसल्या कारणाने इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. ज्याठिकाणी स्वच्छतेची गरज आहे, तेथेच कचर्‍याचे ढीग व धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

स्वच्छता कर्मचारी नसल्या कारणाने इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या स्वच्छतेचा प्रश्‍न गंभीर बनत चालला आहे. ज्याठिकाणी स्वच्छतेची गरज आहे, तेथेच कचर्‍याचे ढीग व धुळीचे साम्राज्य निर्माण झाल्याने रुग्णालयात दाखल रुग्णांच्या आरोग्यालाच धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ▪️या संदर्भातील तक्रारींची गांभिर्याने नोंद घेत आय.जी.एम रुग्णालयास प्रत्यक्ष भेट देऊन वॉर्डासह अतिदक्षता विभागाचीही पाहणी केली. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक अनिल माळी व नगरपरिषदेचे आरोग्याधिकारी डॉ. सुनिलदत्त संगेवार यांची चांगलीच कानउघडणी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. दोन दिवसात स्वच्छता कर्मचारी न नेमल्यास आपण स्वत: आपल्या पध्दतीने यंत्रणा राबवू असा सज्जड इशाराही दिला. ▪️यावेळी कपिल शेटके, राहुल घाट, सुहास कांबळे यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी , रुग्णांचे नातेवाईक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos