सामाजिक कार्ये

आज भारत देशाचा ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिन. देशसेवेसाठी आपल्या बलिदानाची आहुती देणा-या महाराष्ट्रातील करविर तालुक्यातील निगवे (खालसा) येथील वीरपुत्र संग्राम पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करावी, या हेतुने शहीद जवान संग्राम पाटील यांच्या विरपत्नी हेमलता पाटील व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते डीकेटीई राजवाडा येथे ध्वजारोहण संपन्न झाले.

आज भारत देशाचा ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिन. देशसेवेसाठी आपल्या बलिदानाची आहुती देणा-या महाराष्ट्रातील करविर तालुक्यातील निगवे (खालसा) येथील वीरपुत्र संग्राम पाटील यांना श्रध्दांजली अर्पण करावी, या हेतुने शहीद जवान संग्राम पाटील यांच्या विरपत्नी हेमलता पाटील व त्यांच्या कुटुंबीयांच्या हस्ते डीकेटीई राजवाडा येथे ध्वजारोहण संपन्न झाले. २१ नोव्हेंबर २०२० रोजी जम्मू काश्मिर येथील राजौरी येथे सेवा बजावत असताना पाकिस्तानी सैनिकांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात संग्राम पाटील यांना विरमरण आले होते. यावेळी हौताम्य वंदन व सैनिक परिवारास कृतज्ञतानिधी या भावनेने संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे दादा यांच्या समवेत विरपत्नी श्रीमती हेमलता पाटील व कुटुंबीयाकडे आज ७५ व्या अमृतमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त मदतीचा चेक सुपुर्द करण्यात आला. तसेच हु. संग्राम पाटील यांच्या मुलांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी डीकेटीईच्या वतीने घेण्याचे नमूद केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहूल आवाडे , संस्थेच्या सचिव डॉ.सौ. सपना आवाडे, ट्रस्टी सुनिल पाटील, उपसंचालक डॉ.यु.जे. पाटील, उपसंचालिका डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, ए.व्ही. शहा, अजित बलवान, आर.एस.पाटील, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यासह हुतात्मा पाटील कुटुंबीयांचे सर्व सदस्य उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos