सामाजिक कार्ये

आय.जी.एम हॉस्पिटल येथील ऑक्सिजन पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली.

आय.जी.एम हॉस्पिटल येथील ऑक्सिजन पुरवठ्याच्या पार्श्वभूमीवर हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारे ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. ऑक्सिजन तुटवड्यावर मात करण्यासाठी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांच्या पाठपुराव्यानंतर आय.जी.एम हॉस्पिटल येथे हवेतून ऑक्सिजन निर्मिती होऊन दररोज २०० सिलेंडर भरतील असे २ प्लांट उभारण्यात येत आहेत. या तंत्राच्या आधारे कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा होणार आहे. त्याचबरोबर इतर साथीच्या आजारांवर उपचार मिळावेत, यासाठी आय.जी.एम हॉस्पिटल हे ५०% नॉन- कोव्हीड हॉस्पिटल म्हणून सुरु व्हावे, यासंबंधी जिल्हाधिकारी यांच्याकडे चर्चा केली असून येणाऱ्या १ सप्टेंबर पासून हॉस्पिटल मध्ये सर्व साथीच्या आजारांवर उपचार लवकरच सुरु होतील. यावेळी ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, आरोग्य सभापती संजय केंगार, बाळासाहेब कलागते, वैद्यकीय अधिक्षक रवींद्र शेट्ये, डॉ. शेरखान, डॉ. महाडिक, सहाय्यक अधिक्षक भरत शिंदे, कपिल शेटके, विजय पाटील, शार्दूल शेटे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते

Activity Photos

Activity Videos