सामाजिक कार्ये

यंत्रमाग उद्योगासाठी मंजूर अनुदान सुरू करणेबाबत ऊर्जामंत्री मा.ना.श्री.नितीन राउत यांची भेट

12 फेब्रुवारी २०२० रोजी मुंबई मंत्रालय येथे ऊर्जामंत्री मा.ना.श्री. Dr Nitin Raut यांची यंत्रमाग उद्योगासाठी मंजूर अनुदान सुरू करणेबाबत भेट घेतली. महाराष्ट्राचे मॅचेस्टर म्हणून प्रसिद्ध असलेले इचलकरंजी शहर हे #वस्त्रोद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. परंतु मागील काही वर्षांपासून या व्यवसायाला अखेरची घरघर लागली आहे,असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गेल्या काही वर्षापासून या व्यवसायासाठी आवश्यक असलेले अनुदान तसेच नवनवीन योजना मिळाल्या नाहीत. डिसेंबर २०१८ मध्ये वस्त्रोद्योगातील इतर घटकांसाठी विविध #योजना जाहीर करण्यात आल्या होत्या. परंतु वस्त्रोद्योगाला जानेवारी २०१९ पासून त्याचे प्रचलित अनुदानातील १ रु. २२ पैसे कमी केल्यामुळे या व्यवसायाचे नुकसान झाले. सप्टेंबर २०१९ मध्ये यंत्रमाग धारकांच्या अनेक विनंती पत्रांचा विचार करून सप्टेंबर २०१९ मध्ये शासनाने कमी केलेल्या १ रु. २२ पैसे पैकी ४० पैसे अनुदान परत सुरू करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्या पैशांची तरतूद न केल्यामुळे यंत्रमागधारकांना उपरोक्‍त ४० पैसे अनुदान परत सुरू करण्याच्या शासन निर्णय (जी.आर.) झाला परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. अलीकडे मा.उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी याबाबत बैठक घेवुन १ रूपये २२ पैसे वाढवले होते. ते कमी करण्याबाबत चर्चा केली आहे. तरी १ रूपये २२ पैसे हे २७ हॉर्स पॉवर वरील ग्राहकांना वितरीत केले आहेत ते कमी व्हावे तसेच या सोबत साध्या यंत्रमाग धारकांना ही सवलत देणे गरजेचे आहे. त्यांच्या सध्या असलेल्या दरामध्ये १ रूपये प्रति युनिट कमी व्हावे अशी मागणी मा.ना.उर्जामंत्री नितीन राउत यांच्याकडे केली.

Activity Photos

Activity Videos