सामाजिक कार्ये

"पुन्हा साथ देऊया, चला पंचगंगा वाचवूया" या मोहिमेअंतर्गत राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडी

दै. सकाळच्या वतीने, "पुन्हा साथ देऊया, चला पंचगंगा वाचवूया" या मोहिमेअंतर्गत पिरळ (ता.राधानगरी) पासून सुरु असलेल्या राजर्षी शाहू कृतज्ञता जलदिंडीचा समारोप इचलकरंजी पंचगंगा नदीघाट येथे झाला. यावेळी प्रदूषण मुक्तीसाठी ची जलसंवर्धन प्रतिज्ञा आमदार प्रकाशआण्णा आवाडे व सकाळ समुहाचे प्रमुख श्रीराम पवार यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असणारी आपली पंचगंगा नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी दै. सकाळ माध्यमसमूह एकवटले आहे. स्वच्छता मोहीम व जलसंवर्धन प्रतिज्ञेद्वारे लोकांमध्ये जागृती करण्याचे काम ते करीत आहेत. त्यांच्या या मोहिमेचे कौतुक तर आहेच, पण मोहिमेस मिळणारा प्रतिसाद लक्षणीय आहे. पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सर्व घटकातून तसेच या मोहिमेअंतर्गत लोकसहभागातून हा उपक्रम प्रभावीपणे राबविला जात आहे. गैबी बोगद्यातून सोडलेले पाणी निरंतर वाहत राहणे हाच पंचगंगा प्रदूषण मुक्तीसाठी उपाय असून नदीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, असे यावेळी आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले

Activity Photos

Activity Videos