सामाजिक कार्ये

क्लस्टरच्या माध्यमातून इचलकरंजीच्या धर्तीवर कर्नाटक राज्यातील वस्त्रोद्योगाचा विकास व्हावा या संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विशेष निमंत्रित केले होते. त्यानिमित्ताने भेट घेऊन वस्त्रोद्योग वाढीसाठी लागेल ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका मांडली.

क्लस्टरच्या माध्यमातून इचलकरंजीच्या धर्तीवर कर्नाटक राज्यातील वस्त्रोद्योगाचा विकास व्हावा या संदर्भात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी विशेष निमंत्रित केले होते. त्यानिमित्ताने भेट घेऊन वस्त्रोद्योग वाढीसाठी लागेल ते सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका मांडली. महाराष्ट्र हे वस्त्रोद्योगातील प्रमुख केंद्र असून संपूर्ण देशभरातील पन्नास टक्क्यापेक्षा अधिक यंत्रमाग हे महाराष्ट्रात आहेत. इचलकरंजी क्लस्टर, इचलकरंजी पॉवरलूम मेगा क्लस्टर असे महत्वाकांक्षी प्रकल्प वस्त्रनगरी इचलकरंजीत साकारले आहेत. या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञान आणून एकाच छताखाली सर्व प्रक्रियामुळे मोठ्या प्रमाणात खर्चात बचत होणार आहे. माझा या अनुभवाचा आणि अभ्यासाचा कर्नाटक राज्यालाही लाभ व्हावा यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी निमंत्रित केले होते. बेंगलोर येथे भेट घेऊन वस्त्रोद्योगातील नवनवीन तंत्रज्ञानासह निर्माण होणार्‍या अडचणी व विविध प्रश्‍नांवर सविस्तर चर्चा झाली. मुख्यमंत्री बोम्मई यांनी कर्नाटक राज्यातील ज्याठिकाणी कॉटन बेल्ट आहे, त्याठिकाणी इचलकरंजीच्या धर्तीवर क्लस्टरच्या माध्यमातून स्पिनिंग, विव्हिंग, सायझिंग, गारमेंटस् ची उभारणी करावयाची आहे असे सांगत कर्नाटक राज्यातही नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे वस्त्रोद्योग क्षेत्राचा अधिकाधिक विकास करण्यासंदर्भात चर्चा केली. त्यावर वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी जे जे सहकार्य लागेल ते करण्याची तयारी दर्शविली. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, पिडीक्सिलचे चेअरमन नगरसेवक सुनिल पाटील, डीकेटीई चे प्राचार्य डॉ. पी. व्ही. कडोले, डॉ. ए. वाय. वासिफ, सतिश कोष्टी, सागर कोईक, प्रा. सी. ए. पाटील आदी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos