सामाजिक कार्ये

इचलकरंजीला भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा तसेच इतर प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी इचलकरंजी नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांची भेट घेतली.

इचलकरंजीला भेडसावणाऱ्या पाणीपुरवठा तसेच इतर प्रलंबित प्रश्नांसंदर्भात आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी इचलकरंजी नगरपरिषद प्रशासक मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल यांची भेट घेतली. व विविध विषयासंदर्भात चर्चा केली. इचलकरंजीवासियांना भेडसावणार्‍या पाणी पुरवठा संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम सुरु आहे. त्याच अनुषंगाने पंचगंगा नदीतून पाणी उपसा करण्यासाठी जवाहर साखर कारखान्याकडून आवश्यक विद्युत पंप तातडीने उपलब्ध करुन देऊ. त्यामुळे आगामी काही दिवसात शहरातील विस्कळीत पाणी पुरवठा सुरळीत होईल. शिवाय दुधगंगा योजनेसाठी जागा खरेदीचा प्रस्ताव नगरपालिकेकडून जिल्हाधिकार्‍यांकडे पाठविण्यात आला असून त्याचा पाठपुरावा सुरु आहे. प्रस्तावाला प्रशासकीय मंजूरी मिळताच योजना कामाला गती मिळणार आहे, असे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले. दरम्यान, आयजीएम रुग्णालय शासनाकडे हस्तांतरण करताना जागा संदर्भात काही तांत्रिक बाबी प्रलंबित आहेत. त्या संदर्भात महसूल विभागाशी संपर्क साधून त्या दूर करण्याच्या सूचना आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी केल्या. सध्या आयजीएम रुग्णालय इमारतीसह आवश्यक दुरुस्तीची कामे सुरु असून लवकरच 300 बेड क्षमतेचे करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पुढील काळात या रुग्णालयात विविध सुविधा पीपीपी तत्वावर उपलब्ध करुन दिल्या जाणार असल्याचे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले. पाणी प्रश्‍नासंदर्भातील अडचणी दूर करण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी पंचगंगा नदीतून पाणी उपसा करण्यासाठी जवाहर साखर कारखान्याच्या माध्यमातून विद्युत पंप तातडीने उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्यामुळे येत्या चार दिवसांत शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होईल, तर दुधगंगा नळपाणी योजनेसाठी जागा खरेदीचा प्रस्ताव पालिकेने जिल्हाधिका-यांकडे पाठविला आहे. त्याबाबत पाठपुरावा सुरु असून या प्रस्तावाच्या प्रशासकीय मंजुरीनंतर या योजनेच्या कामाला गती मिळेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शहरातील ज्वलंत पाणीप्रश्‍नांसह कोरोना प्रतिबंधक उपाययोजना, दुकानगाळ्यांचा लिलाव, बांधकाम परवाने, झोपडपट्टी पुनर्वसन, शहापूर क्रिडा संकुल, सहाय्यक अनुदानातील कपात आदी विविध प्रलंबित कामांचा आढावा संदर्भात आमदार प्रकाशआण्णा आवाडे हे नगरपालिकेत आले होते. मुख्याधिकारी तथा प्रशासक डॉ. प्रदीप ठेंगल यांच्या दालनात विविध खाते प्रमुखांची बैठक घेत प्रलंबित प्रश्‍नांबाबत व्यापक चर्चा केली. आणि पुढील कार्यवाहीसंदर्भात संबंधितांना सूचना दिल्या. शहराला दैनंदिन 60 एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना प्रत्यक्षात अवघे 34 एमएलडी इतकेच पाणी उपलब्ध होते. त्यामध्येही जलवाहिनी गळती उद्भवल्यास पाणी पुरवठा विस्कळीत होतो, असे सांगितले. त्यावर पंचगंगा नदीतील पाणी उपसा करण्यासाठी 250 अश्‍वशक्तीचा एक पंप जवाहर साखर कारखान्याकडून तातडीने उपलब्ध करुन देऊ, असे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले. त्याचबरोबर कट्टीमोळा डोह हा कायमस्वरुपी पर्याय नसून केवळ गरजेवेळीच तेथून पाणी उपसा केला जाईल असेही स्पष्ट केले. दुधगंगा नळपाणी योजनेचे काम काही तांत्रिक बाबींमुळे रेंगाळले असून योजनेच्या उपसा केंद्रासाठी जागा निश्‍चीत करण्यात आली आहे. जागा खरेदीचा प्रस्ताव नगरपालिकेने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला असून त्याला प्रशासकीय मंजुरीसाठी पाठपुरावा सुरु आहे. त्यामुळे या योजनेच्या कामाला गती मिळणार असल्याचे सांगितले.

Activity Photos

Activity Videos