सामाजिक कार्ये

दुधगंगा नदीतून इचलकरंजीसाठी केवळ पिण्याचे पाणी उचलले जाईल. सुळकुडच्या हक्काच्या पाण्याला कोणताही धक्का लागू देणार नाही. म्हणूनच सुळकूडसह नदीकाठावरील गावांनी सामंजस्यातून मार्ग काढून इचलकरंजीच्या दुधगंगा पाणी पुरवठा योजनेला परवानगी द्यावी, असे आवाहन हुपरी येथे संपन्न सर्वसमावेशक बैठकीत करण्यात आले. तर या संदर्भात सुळकूड ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासह भविष्यात उपासबंदी केली जाणार नाही याची राज्य शासनाने हमी द्यावी, अशी मागणी गावातील प्रमुख मंडळींनी केली

दुधगंगा नदीतून इचलकरंजीसाठी केवळ पिण्याचे पाणी उचलले जाईल. सुळकुडच्या हक्काच्या पाण्याला कोणताही धक्का लागू देणार नाही. म्हणूनच सुळकूडसह नदीकाठावरील गावांनी सामंजस्यातून मार्ग काढून इचलकरंजीच्या दुधगंगा पाणी पुरवठा योजनेला परवानगी द्यावी, असे आवाहन हुपरी येथे संपन्न सर्वसमावेशक बैठकीत करण्यात आले. तर या संदर्भात सुळकूड ग्रामस्थांची मते जाणून घेण्यासह भविष्यात उपासबंदी केली जाणार नाही याची राज्य शासनाने हमी द्यावी, अशी मागणी गावातील प्रमुख मंडळींनी केली. इचलकरंजी शहरासाठी राज्य शासनाने दुधगंगा नदी येथून सुळकूड उद्भव धरुन पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. परंतु या योजनेला सुळकूडसह काही गावातून विरोध होत आहे. या प्रश्‍नी चर्चा आणि सामंजस्यातून मार्ग काढण्यासह समज-गैरसमज दूर करण्यासाठी नदीकाठावरील गावातील प्रमुख नेतेमंडळी तसेच इचलकरंजीच्या नगराध्यक्षा, उपनगराध्यक्षांसह विविध राजकीय पक्षांचे नेते यांची संयुक्त बैठक जवाहर साखर कारखाना येथे आयोजित केली होती. या बैठकीत जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, पाणी पुरवठा सभापती दीपक सुर्वे, नगरसेवक सागर चाळके, प्रकाश मोरबाळे, सुनिल पाटील, नितीन जांभळे, रविंद्र माने, महादेव गौड, माजी पाणी पुरवठा सभापती विठ्ठल चोपडे , आरोग्य सभापती संजय केंगार,राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी, शहाजी भोसले यांच्यासह युवराज पाटील, अ‍ॅड. बाबासाहेब मगदूम, युवराज पाटील, इरगोंडा टेळे, बाबासाहेब मगदूम, अमर शिंदे, अमोल शिवई , बसगोंडा मगदूम, किणर मुद्दाण्णा, दादासो भिकाप्पा पाटील, अरुण पोवाडे, क्रांतीकुमार पाटील, शरद धुळूगडे, सुकुमार हेगडे, दादासो यवई, नरहर माळी, इरगोंडा टेळे, सुदर्शन मजले, संदीप क्षिरसागर, अमर शिंदे, दत्तात्रय पाटील, अमोल शिवई आदी सुळकुड, मौजे सांगाव, कसबा सांगाव भागातील प्रमुख मंडळी उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos