सामाजिक कार्ये

शासनाच्या एनएबीएल अ‍ॅक्रीडेशननुसार इचलकरंजीतील IGM चे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी करून माहिती जाणून घेतली.

शासनाच्या एनएबीएल अ‍ॅक्रीडेशननुसार इचलकरंजीतील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे नुतनीकरणाचे काम सुरु आहे. या कामाची पाहणी करून माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक त्या सूचनाही केल्या. राज्य शासनाने रुग्णालयासाठी एमआरआय व सिटीस्कॅन मशिन मंजूर केले आहे. इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय हे राज्यातील नव्हे तर देशातील एक नंबरचे रुग्णालय करण्याचा मानस आहे. दोन वर्षापासून जो पाठपुरावा केला त्याला यश आले असून केलेल्या पाठपुराव्यातून राज्याच्या आरोग्य विभागाने इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इमारत दुरुस्तीसाठी 13.35 कोटी आणि कर्मचारी निवासस्थान दुरुस्ती कामासाठी 4.92 कोटी असा 18.27 कोटीचा निधी मंजूर केला आहे. त्यानुसार रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावर न्युरो, हार्ट, आर्थोपेडीक व जनरल असे 4 आणि तळमजल्यावर अ‍ॅक्सिडेंटल व मॅटर्निटी असे 2 अत्याधुनिक मशिनरी असलेले एकूण 6 ऑपरेशन थिएटर असणार आहेत. सन 2016 मध्ये इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल राज्य शासनाकडे हस्तांतर करण्यात आले. सध्या 200 बेडचे रुग्णालय असून ते 300 बेडचे होण्यात काहीच अडचण नाही. केवळ रुग्णालय व कर्मचारी निवासस्थान जागा शासनाच्या नावावर अद्यापही न झाल्याने ते काम रखडले होते. त्या कामाचाही पाठपुरावा करुन ते काम अंतिम टप्प्यात आले असून लवकरच 300 बेडची मंजूरी मिळेल. त्याचबरोबर याठिकाणी एमबीबीएसचे मेडीकल कॉलेज सुरु करण्यात येणार आहे. रुग्णालय हस्तांतरावेळी राज्य शासनाने मान्य केलेल्या दरवर्षी 11 कोटी रुपयांतील 55 कोटी रुपये मंजूर झाले असून शासनाकडे निधी देण्याऐवजी रुग्णालयात आवश्यक अत्याधुनिक मशिनरी देण्यात यावी, अशी मागणी केली तसेच त्याचा प्रस्ताव वैद्यकिय अधिक्षक डॉ. रविंद्रकुमार शेट्ये यांनी तयार करुन तो शासनाला पाठविला आहे. त्याचबरोबर वैद्यकिय अधिकारी व कर्मचार्‍यांसाठीसुध्दा सर्व सुविधांनीयुक्त घरकुले बांधून दिली जाणार आहेत. सर्वांच्या सहकार्याने रुग्णालयाचे रुपडे पालटत असून अत्याधुनिक यंत्रणांनी सुसज्ज असे हे रुग्णालय होणार आहे. याकामी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे तसेच आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Activity Photos

Activity Videos