सामाजिक कार्ये

इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने 15 व्या वित्त आयोग निधी अंगर्तग पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी कट्टीमोळा डोह येथून पाणी उपसा करण्यासाठी वाढीव नळ पाणी योजना करण्यात येत आहे. या वाढीव नळपाणी योजनेचा भूमीपूजन व पाइपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला.

इचलकरंजी नगरपरिषदेच्यावतीने 15 व्या वित्त आयोग निधी अंगर्तग पंचगंगा नदीतून पाणी पुरवठा पुरेशा प्रमाणात व्हावा यासाठी कट्टीमोळा डोह येथून पाणी उपसा करण्यासाठी वाढीव नळ पाणी योजना करण्यात येत आहे. या वाढीव नळपाणी योजनेचा भूमीपूजन व पाइपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ संपन्न झाला. पंचगंगा प्रदुषित होण्यापासून वाचविणे आणि कृष्णा योजनेची गळती काढणे यासाठी कालावधी लागणार आहे. तोपर्यंत कट्टीमोळा डोहातील पाणी शहरवासियांना उपयोगी ठरणार आहे. या योजनेमुळे उन्हाळ्यात कोणत्याही प्रकारची पाणीटंचाई भासणार नाही. कृष्णा-पंचगंगा-कट्टीमोळा आणि भविष्यातील दुधगंगा योजना यामुळे शहराला पाणीटंचाई भासणार नाही, आगामी काही महिन्यात इचलकरंजीकरांना शंभर टक्के दुधगंगेतून पाणी मिळेल असा विश्‍वास व्यक्त केला. यावेळी कट्टीमोळा येथील जागेचे मालक बापूसो मगदूम यांनी या योजनेसाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे साहेब, माजी खासदार राजू शेट्टी,नगराध्यक्षा अलका स्वामी, जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे दादा, उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, नगरसेवक मदन कारंडे,ताराराणी पक्षाचे अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, नगरसेवक सुनील पाटील, पाणी पुरवठा सभापती दिपक सुर्वे, आरोग्य सभापती संजय केंगार, माजी पाणीपुरवठा सभापती विठ्ठल चौपडे, संजय कांबळे, सौ. गीता भोसले, सौ. बिलकिस मुजावर, संजय कांबळे, , अजितमामा जाधव, प्रकाश मोरबाळे, पापालाल मुजावर, विठ्ठल सुर्वे, नंदू पाटील, फुलचंद चौगुले, आर. के. पाटील, श्रेणिक मगदूम, राजू आलासे, सदा मलाबादे, जलअभियंता सुभाष देशपांडे, बाजी कांबळे, श्री. परीट आदींसह शेतकरी व नागरिक उपस्थित होते .

Activity Photos

Activity Videos