सामाजिक कार्ये

वीज दरवाढ आंदोलनाचे निवेदन ....

१ फेब्रुवारी २०२० गेली चार-पाच वर्षे जागतिक मंदी असल्यामुळे सर्व उद्योग अडचणीतून मार्गक्रमण करीत असताना वेळोवेळी होणारी वीज दरवाढ चालूच आहे. वीज दरवाढ प्रस्तावाचा प्रचंड मोठा फटका ग्राहक, लघुउद्योग ग्राहक व यंत्रमागधारक, व्यापारी ग्राहक यांना बसणार आहे. यासाठी इचलकरंजी यंत्रमाग व औद्योगिक संघटना समन्वय समिती च्या वतीने महावितरण कार्यालयावर वीज दरवाढ विरोधी प्रचंड मोर्चा व होळी आंदोलन करण्यात आले. मोर्चावेळी सर्वांनी आपापल्या परीने हा प्रश्‍न सोडविण्यासाठी प्रयत्न करून शासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यास प्रसंगी उपोषण करण्यासह आर या पार च्या लढाईसाठी सज्ज व्हावे, असे आवाहन केले. या आंदोलनाचे निवेदन मा.मुख्यमंत्र्यांचे शासन प्रतिनिधी प्रांताधिकारी विकास खरात यांना सहकाऱ्यांसमवेत दिले.

Activity Photos

Activity Videos