सामाजिक कार्ये

वस्रोद्योग व्यवसायातील अडचणी संदर्भात संयुक्त बैठक

वस्रोद्योग व्यवसायातील सद्यस्थितीच्या अडचणी संदर्भात आमदार प्रकाशआण्णा आवाडे व यंत्रमाग संघटनेचे प्रतिनिधी आणि वस्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांची संयुक्त बैठक इचलकरंजी येथे संपन्न झाली. राज्यातील वस्त्रोद्योगाला एक नवी दिशा व उर्जितावस्था प्राप्त व्हावी यासाठी आता चाकोरीच्या बाहेर जाऊन विचार करण्याची वेळ असून चर्चा आणि विचारविनिमयातून नवे धोरण ठरणार आहे. यंत्रमागधारकांनी वीज बिले जुन्या दराप्रमाणे भरुन शासनाला सहकार्य करावे अन्यथा हा उद्योग उद्ध्वत होऊन जाईल. त्याचबरोबर शासनानेही सन 2016 मध्ये जाहीर केलेली साध्या यंत्रमागासाठीची 1 रुपयांची वीज सवलत, 5 टक्के व्याज सवलत आणि 75 पैशांची अतिरिक्त सवलत याची तातडीने अंमलबजावणी करावी. तर मागील सरकारच्या शिफारशी जशाच्या तशा घेऊन त्यामध्ये आणखीन काय वाढ करता येईल याचा सरकारने विचार करावा, असे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले. इचलकरंजी हे देशातील १ लाख ७० हजार पर कॅपिटल देणारे दुसरे शहर आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहराच्या आसपास परिसरामध्ये तीन MIDC आहेत, परंतु इचलकरंजी व परिसरामध्ये खाजगी व सहकारी आद्योगिक वसाहती वगळता शासनाची एकही MIDC नाही. शिवाय येत्या 1 एप्रिलपासून केंद्र शासनाकडून सध्या मिळणार्‍या टफस् योजना अंतर्गत मिळणारी 10 टक्क्यांची सबसिडी 25 टक्के केली जाणार आहे. तर केंद्र सरकारने घोषित केलेल्या 7 मेगा टेक्स्टाईल पार्कपैकी एक प्रकल्प महाराष्ट्रात व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्यासरकारने केंद्राकडे मागणी केली नाही, अशी खंत व्यक्त करीत हा प्रकल्प होण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत, असे आमदार प्रकाशआण्णा आवाडे यांनी सांगितले.

Activity Photos

Activity Videos