सामाजिक कार्ये

प्रांत कार्यालय, इचलकरंजी येथे आय.जी.एम हॉस्पिटलच्या जागेसंदर्भात निर्णय घेण्याबाबत बैठक पार पडली.

प्रांत कार्यालय, इचलकरंजी येथे आय.जी.एम हॉस्पिटलच्या जागेसंदर्भात निर्णय घेण्याबाबत बैठक पार पडली. २०१६ साली आय.जी.एम हॉस्पिटल हे नगरपालिकेच्या वतीने महाराष्ट्र शासनाकडे हस्तांतरित करण्यात आले. हस्तांतरण करीत असताना संपूर्ण इमारत व कर्मचारी निवासस्थान हस्तांतरित करण्यात आले, परंतु हॉस्पिटलच्या जागेच्या हस्तांतरणबाबत कोणतीही कागदोपत्री नोंद झालेली नाही. यामुळे हॉस्पिटलच्या विविध विकास कामांना अडचण येत असून हॉस्पिटलच्या जागेसंदर्भात कागदोपत्री दुरुस्ती करून ती शासनाकडे त्वरित हस्तांतरित करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, असे बैठकीत निर्णय झाला. बैठकीस प्रांताधिकारी डॉ. विकास खरात, तहसीलदार शरद पाटील, मुख्याधिकारी प्रदीप ठेंगल, ताराराणी पक्ष अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, आरोग्य सभापती संजय केंगार, शशिकांत पाटील, बबन खोत, रणजीत कोरे, कपील शेटके, विजय पाटील आदि उपस्थित होते.

Activity Photos

Activity Videos