सामाजिक कार्ये

#कोल्हापूर जिल्ह्यातील #महापूराच्या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षेनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी कोल्हापूर पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांची भेट घेऊन #इचलकरंजी पूरपरिस्थितीबाबत माहिती दिली, तसेच विविध विषयावर चर्चा केली.

#कोल्हापूर जिल्ह्यातील #महापूराच्या पार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षेनेते मा. देवेंद्रजी फडणवीस यांनी कोल्हापूर पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांची भेट घेऊन #इचलकरंजी पूरपरिस्थितीबाबत माहिती दिली, तसेच विविध विषयावर चर्चा केली. इचलकरंजी शहर व परिसरातील नदीकाठचे अनेक नागरीक जीव वाचविण्यासाठी आपली घरे सोडून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. या नागरीकांना तातडीची #मदत म्हणून प्रती व्यक्ती रू.२ हजार देणेत द्यावेत. तसेच प्रती कुटूंब २५ किलो गहू व २५ किलो तांदूळ मोफत देणेत यावेत. सर्व नुकसानग्रस्त #शेतकरी, नागरीकांचे तातडीने #पंचनामे करावेत. पूरामुळे होणाऱ्या छोट्या उद्योगांच्या नुकसानीपोटी त्या उद्योगांच्या नुकसानीचे पंचनामे जिल्हा #उद्योग केंद्राकडून करून त्यांना तातडीची मदत म्हणून रू. ५० हजार द्यावेत. यासह अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी, नागरीक व छोट्या उद्योजकांची #कर्जमाफी करावी,तसेच त्यांच्या कृषीपंपाची, #घरगुती वीजेची व उद्योगासाठी वापरण्यात येणाऱ्या वीजेची बिले पूर्णपणे माफ करावीत,पूरग्रस्त भागातील खराब मीटर #महावितरण तर्फे तात्काळ मोफत बदलून द्यावेत.पूर्णपणे पडलेल्या घरांसाठी केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेचे रू.२ लाख ७३ हजार व राज्य शासनाचे रू.२ लाख ७३ हजार एकत्रित #अनुदान देऊन त्यांना घर बांधणीसाठी सहकार्य करावे. अंशतः पडलेल्या घरांसाठी पडझडीमुळे प्रत्यक्ष झालेल्या नुकसानीचे प्रमाणात शासनाने मदत करावी. तात्पुरत्या निवाऱ्याकरिता शहरी भागासाठी रू. ३६ हजार व ग्रामीण भागासाठी रू.२४ हजार इतकी .एकरकमी मदत शासनाकडून करावी. २७ एच. पी. वरील यंत्रमागांसाठी वीज दरात प्रती युनिट अतिरिक्त ७५ पैशांची अतिरीक्त सवलत देण्याबाबत जाहीर केले होते. याची अंमलबजावणी करावी व २७ एच. पी. खालील यंत्रमागांसाठी प्रचलित वीज दरामध्ये प्रती युनिट १ रूपयाची सवलत द्यावी. #यंत्रमाग उद्योजकांना ५ टक्के व्याज अनुदान जाहीर केले होते. ते अनुदान मिळणेबाबतचे जवळपास २,५०० प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित आहेत. या प्रलंबित प्रस्तावांना त्यावेळच्या शासन निर्णयाप्रमाणे त्वरीत अनुदान देणेत यावे.पूरग्रस्त लघु उद्योजकांचे ३ महिन्यांचे वीज बिल माफ करणेत यावे. अशा सर्व मागण्यासोबत उद्योगाशी निगडीत सर्व घटकांना दिलासा देणेबाबत आपण जरूर ते प्रयत्न करावेत, असे निवेदन विरोधी पक्षनेते मा. Devendra Fadnavis यांच्याकडे दिले.

Activity Photos

Activity Videos